महाराष्ट्राच्या सिमेवर मोठी घटना
छत्तीसगड:- छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या विरोधात सुरक्षा यंत्रणा आक्रमक झाली आहे. तब्बल 12 तासापासून सुरू असलेल्या चकमकीत 1200 जवानांनी 12 माओवाद्यांना कंठ स्नान घातले आहे.
गडचिरोली जिल्ह्याला लागून छत्तीसगडचा बिजापूर जिल्हा आहे. या बिजापूर जिल्ह्यात पीडिया चा जंगल आहे. हा भाग सुकमा, दंतेवाडा, बिजापूर या तीन जिल्ह्याच्या सीमा एकत्र येणारा माओवाद्यांसाठी कोअरझोन असलेला भाग आहे. या भागात माओवाद्यांच्या मोठ्या नेत्यांची उपस्थिती असल्याची विश्वासनीय माहिती बस्तर पोलिसांना मिळाली होती. गेल्या काही दिवसांपासून बिजापूर आणि सुकमा पोलीस माओवाद्यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.
माओवाद्यांचे मोठे नेते पापा राव माओवादी कमांडर लिंगा यासह काही मोठे माओवादी त्या जंगलात उपस्थित होते. या नेत्यांसह माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचे तसेच माओवाद्यांच्या काही मोठ्या समित्यांचे नेतेही उपस्थित असल्याची माहिती बस्तर पोलिसांना मिळाली होती. मूळचे कोल्हापूरचे असलेले सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांच्यासह बिजापूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव आणि दांतेवाडाचा च्या पोलिस अधीक्षकांनी संयुक्त मोहीम रात्री आखली त्यानंतर तब्बल बाराशे जवानांना या भागात रात्रीपासून रवाना करण्यात आले. या विशेष पथकामध्ये बस्तर पोलिसांसह कोब्रा बटालियन, डी आर जी चे जवान सामील होते. सकाळी या जंगलात माओवाद्यांना घेरण्यात आलं. त्यानंतर त्या ठिकाणी चकमक सुरू झाली सकाळी सुरू झालेली चकमक संध्याकाळ उशिरापर्यंत सुरूच होती. या चकमकीत 12 माओवादी ठार झाले आहेत.
या माओवाद्यांची ओळख पटली नसली तरी यात काही जहाल माओवाद्यांचा समावेश असल्याची शक्यता आहे. मृतक माओवाद्यांच्या मृतदेहासह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आहे. त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आहे. या चकमकीत आणखी काही माओवादी जखमी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.. या चकमकीत माओवाद्यांनी पेरलेल्या आईडीच्या स्फोटात दोन जवान जखमी झाले असून हेलिकॉप्टरने त्यांना उपचारासाठी रायपूरला पाठवण्यात आले आहे.