गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद आता जवळजवळ संपुष्टात आला असून, कधीकाळी गडचिरोली जिल्ह्रातील 10 उपविभागात सक्रिय असणारी माओवाद चळवळ आता फक्त भामरागड उपविभागाच्या सिमावर्ती भागातच कैद झालेली आहे. यासोबतच शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमूळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 794 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.
आज दिनांक 19/03/2026 रोजी अकरा जहाल माओवादी नामे
1) सोनी ऊर्फ बाली वत्ते मट्टामी (डिव्हीसीएम- कुतुल दलम) वय 45 वर्षे, रा. बालेवाडा, ता. कोहकामेटा, जि. नारायणपूर (छ.ग.)
2) बुदरी ऊर्फ रामबत्ती आयतु मट्टामी (एरीया कमिटी सचिव – इंद्रावती एरीया कमिटी), वय 40 वर्षे, रा. बोडगा, ता. व जि. बीजापूर (छ.ग.),
3) सुखलाल बोळगा कोक्सा (कमांडर - पश्चिम ब्युरो सप्लाय टीम), वय 31 वर्षे, रा. काकुर, ता. कोहकामेट्टा, जि. नारायणपूर (छ.ग.),
4) शांती ऊर्फ सोमरी गंगा तेलामी (पिपीसीएम - पश्चिम ब्युरो सप्लाय टीम), वय 28 वर्षे, रा. नागाराम, ता. कोंटा, जि. सुकमा (छ.ग.),
5) यमुनक्का ऊर्फ रुखमाक्का पोट्टी पेंदाम (एसीएम – भामरागड दलम), वय 60 वर्षे, रा. गुड्डीगुडम (पोस्टे राजाराम खां), ता. अहेरी, जि. गडचिरोली
6) गणेश उलगे कोवासी (सदस्य – कंपनी क्र. 10), वय 21 वर्षे, रा. हिक्केर (पोस्टे गर्देवाडा), ता. एटापल्ली, जि. गडचिरोली,
7) मिनको ऊर्फ जमनी काया मट्टामी (सदस्य – कंपनी क्र. 10), वय 22 वर्षे रा. मुस्पर्शी (पोस्टे बांधे), ता. पखांजूर, जि. कांकेर (छ.ग.),
8) धनु दसरु वेळंजे (सदस्य – कंपनी क्र. 10), वय 38 वर्षे, रा. ताडगाव, ता. भामरागड, जि. गडचिरोली,
9) सुनिता ऊर्फ वंगे वत्ते होयाम (सदस्य - सँड्रा दलम), वय 25 वर्षे, रा. वेलगंड्रा (पोस्टे परसेगड), तह. व जि. बीजापूर (छ.ग.),
10) रमेश पांडू मडावी (सदस्य – मोबाईल पोलीटीकल स्कुल), वय 28 वर्ष, रा. गोगागुडा, तह. व जि. सुकमा (छ.ग.),
11) किशोर सुक्रैय्या वासम (मिलिशीय कमांडर - सँड्रा दलम), वय 33 वर्षे, रा. सँड्रा (पोस्टे परसेगड), ता. भोपालपट्टनम्, जि. बिजापूर (छ.ग.) यांनी गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले आहे.
विशेष म्हणजे दिनांक 15 ऑक्टोंबर 2025 रोजी पोलीत ब्युरो सदस्य, केंद्रीय समिती सदस्य, प्रवक्ता-सिपीआय माओवादी तसेच सचिव-केंद्रीय रिजनल ब्युरो मल्लोजुला वेनुगोपाल राव ऊर्फ भुपती ऊर्फ सोनू याच्यासह एकूण 61 माओवाद्यांनी 54 अग्निशस्त्रांसह मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केल्यामुळे गडचिरोली आणि संपूर्ण दंडकारण्य विभागातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसलेला होता. गडचिरोली जिल्ह्रातील माओवादी चळवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आली असून भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर देशभरात एकूण 897 माओवादी सदस्यांनी 545 शस्त्रांसह आत्मसमर्पण केले आहे.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते आतापर्यंत एकूण 157 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, त्यापैकी सन 2025 पासून आजपावेतो (आज आत्मसमर्पित झालेल्या 11 माओवाद्यांसहित) एकूण 123 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक (नविअ) श्री. संदिप पाटील यांनी उर्वरीत माओवाद्यांना हिंसेचा त्याग करुन आपली शस्त्रे खाली ठेवून सन्मानाचे जीवन जगण्यासाठी लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामिल होत शांततेचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन केले आहे.
सदर कार्यक्रमाप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) श्री. संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., सहाय्यक पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष अभियान पथक, पोलीस मुख्यालय तसेच सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

