Chandrapur News: चंद्रपूर महापालिकेत 'मनस्वी' पर्व; स्थायी समिती सभापती पदाची सूत्रे स्वीकारली!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेची 'पॉवर हाऊस' समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापती पदाचा पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. सौ. मनस्वी संदीप गिऱ्हे यांनी आपल्या नवीन जबाबदारीचा अधिकृत पदभार स्वीकारला आहे.

यावेळी महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, आ. सुधीर मुनगंटीवार, आ. किशोर जोरगेवार, शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, त्यांच्या समर्थकांनी आणि भाजपा-शिवसेना शिंदे गट-शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्त्यांनी महापालिकेत मोठी गर्दी केली होती. या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील दिग्गज आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


चंद्रपूरच्या विकासाला गती देणे आणि प्रलंबित कामे मार्गी लावणे, हे आपले मुख्य ध्येय असल्याचे नवनियुक्त सभापतींनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.