(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय बिंजवे, ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी:- तेंदुपत्ता संकलननासाठी राजस्थानात गेलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मजुराचा मृत्यु झाल्याची घटना दि.२१ मे ला दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. जैराम गजानन ढोरे वय ४५ रा. निलज ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर असे मृतक मजुराचे नाव आहे.
तेंदुपत्ता संकलनाच्या कामाकरिता विदर्भातील मजूर मोठ्या प्रमाणात राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, ओडीसा राज्यामध्ये जात असतात. घरची परिस्थिती बिकट असल्याने निलज येथील जैराम ढोरे हा सुद्धा मजूर इतर मित्रांसोबत राजस्थानात तेंदुपत्ता संकलनाच्या कामाकरिता केला होता. काल दिनांक २१ मेला ढोरे हा पहाटेच्या सुमारास शौचालयास जातो म्हणून राहत्या ठिकाणावरून निघून गेला होता. बराच वेळ होऊन राहत्या ठिकाणी परत न आल्याने सहकाऱ्यांनी त्याची शोधाशोध केली असता काही अंतरावर जैराम ढोरे हा मृत पावलेला आढळून आल्याची माहिती समोर येताच सहकार्यांमध्ये खळबळ उडाली.
घटनेची माहिती वरिष्ठांना व घरच्यांना दिली. घटनास्थळी पोलीस दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेत शव विच्छेदन करून निलज येथे पाठविले. २२ मे रोजी जैराम ढोरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मृतकाच्या पश्चात पत्नी, दोन मुले,बहिणी व बराच मोठा आप्त परिवार आहे. जैराम ढोरे यांच्या आकस्मित निधनाने निलज गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.