Click Here...👇👇👇

DCM Ajitpawar: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेला अर्थ विभागाचा विरोध नाही! #Chandrapur #Mumbai

Bhairav Diwase
1 minute read
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण 
मुंबई:- काही प्रसारमाध्यमांमध्ये 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' या योजनेला अर्थ विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत. प्रसारमाध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार यांनी शनिवार, दि. २७ जुलै रोजी केले. राज्यातील कुणाचाही अशा बातम्यांवर विश्वास बसणार नाही, अशी खात्री व्यक्त करतानाच 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक भगिनींना सहभागी करून घेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही यांनी केले आहे.

महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजनमंत्री म्हणून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजना राज्याच्या वर्ष २०२४ - २५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात ही योजना सादर केली आहे. वित्त व नियोजन, सर्व संबंधित विभाग तसेच राज्यमंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

३५ हजार कोटींची तरतूद

चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण ३५ हजार कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद यावर्षीच्याच अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार? हा प्रश्नच उद्भवत नाही असे ठणकावून सांगतानाच महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे.

राज्यातील माता-भगिनी-मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी, मान, सन्मान, स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्यशासनाची तयारी आहे. त्यामुळे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ला या राज्यातील कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही आणि असूच शकत नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.