महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय राजुरा येथे श्रीगुरुदेव क्रांतीज्योत यात्रेचे थाटात आगमन.
राजुरा:- दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी वंदनीय राष्ट्रसंत श्री .तुकडोजी महाराज मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे वस्तीगृह महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय राजुरा इथे क्रांतीज्योत यात्रेच्या पालखीचे थाटात स्वागत करण्यात आले. या क्रांतीज्योत यात्रेतील पालखीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली, या पालखी रॅलीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील विद्यार्थ्याचे बँड पथक,लेझीम पथक, टिपरी पथक यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली शालेय विध्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विविध गावातील भजन मंडळ त्याचप्रमाणे तालुक्यातील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे विविध उपासक , उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या,या कार्यक्रमाला मार्गदर्शन करतांना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे स्वातंत्र लढ्यातील योगदान काय होते या विषयी प्रा. अशोकजी चरडे सर यांनी "अब काहे को धूम माचाते हो ! दुखवाकर भारत सारे! आते है नाथ हमारे"महाराजांच्या अशा क्रांतिकारी विविध भजनांचे उद्दाहरण देउन स्वातंत्र्याची मशाल महाराजांनी कशा प्रकारे पेटवली यांची विस्तृत माहिती आपल्या मनोगतातून वेक्त केली, या कार्यक्रमाला प्रमूख अतिथी प्रचार सेवाधिकरी सन्मा प्रा.रूपलालजी कावळे सर यांनी "या कोवळ्या कळ्यामाजी, लपले ज्ञानेश्वर ,रवींद्र ,शिवाजी,! विकसता प्रकटतील समाजी ,शेकडो महापुरुष " या ओवीद्वारे मुलांनी समाज सेवेचा ध्यास धरावा व आपले जीवन उज्वल करावे असे मत वेक्त केले,, क्रांतीज्योत यात्रा प्रमुख श्री सुशीलजी बुरडे, यांनी विद्यार्थ्यांनी संतांच्या विचाराचे पाईक होऊन भारताच्या उज्वल भविष्याकरीता युवक व विद्यार्थ्यांनी समोर कार्य करावे असे मत आपल्या मनोगतातून वेक्त केले.विदर्भ प्रांताधिकारी विठ्ठलरावजी सावरकर , प्रचारक श्री.एकनाथजी गाउत्रे महाराज , भजन प्रमूख राजेंद्रजी कोहाळे , कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव सन्मा .श्री सुभाष ताजने सर ,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील सर, यांची विचार मंचावर प्रमूख उपस्थिति होती, गुरुदेव सेवा मंडळाचे श्री अनीलजी चौधरी, श्री मारोती सातपुते सर, श्री लटारू मत्ते सर, श्री शैलेशजी कावळे महाराज ,श्री गजेंद्र देरकर, श्री महादेव पोटे, श्री देवीदास मालेकर, श्री रामप्रसाद बुटले, श्री गोपाडा बुरांडे,श्री गजेंद्र ढवस, श्री महादेवजी काळे, श्री राजेन्द्र मालेकर, श्री मनोहरजी बोबडे , श्री गोहकर सर, श्री रत्नाकरजी नाकावर, श्री भगतजी, श्री भोजेकर जी,श्री परशुराम साळवे महाराज, श्री उज्वलजी शेंडे, बलिरामजी बोबडे , , श्री उत्तमजी अवघडे, श्री बावणे जी, श्री बुटले महाराज श्री गजाननजी बोढे, श्री आनंदराव वडस्कर ,श्री रामदास चौधरी , श्री दौलत झाडे, श्री नत्थु पायपरे, श्री गजनान घुगुल, श्री रवींद्र लांडे, निखिल गिरी, सौ अरुणा चौधरी, सौ विभा पिंपळकर , सौ संगीता पिंपळकर , सौ जयश्री उरकुंडे , सौ सरोजीनी हिवरे , सौ लताताई ठमके , सौ कुसुम हेपट ,सौ शशिकला बोबडे, सौ ताणेबाई बोबडे , श्रीमती नांदेकर, सौ सातपुते मॅडम, सौ आरती शेंडे , सौ प्रतिभा बोडे , सौ अश्विनी वांढरे, सौ सुवर्णा कावळे, प्रा .नलिनी मेश्राम, केतकी कावळे ,काव्या वांढरे, इत्यादींची उपस्थिति होती,हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता शाळेतील शिक्षकवृंद श्री डाहुले सर, श्री चींतलवार सर, श्री निखाडे सर, श्री कांबळे सर,श्री परचाके सर, प्रा. नुगुरुवार सर,श्री काळे सर ,श्री मेंढे सर ,श्री निमकर सर, श्री जुनघरे सर ,श्री मडावी सर, श्री अमित कोतकेलवार, श्रीमती धोटे मॅडम, सौ साळवे मॅडम, सौ गोरे मॅडम सौ उरकुडे मॅडम, श्रीमती इंदुबाई , श्रीमती चंचुबाई , वस्तीगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनी,यांनी अथक परिश्रम घेउन कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमाचे उत्तम असे संचालन रामपुर गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव श्री. प्रकशजी उरकुंडे सर, यांनी, कार्यक्रमाचे प्रस्ताविक ग्रामगीता जीवन विकास परीक्षा तालुका प्रमुख श्री. मोहनदास मेश्राम सर,यांनी तर कार्यक्रमाचा शेवटचा भार म्हणजे आभार गुरुदेव सेवा मंडळ सहकारनगर येथील सक्रिय प्रसिध्दी प्रमुखं श्री देवीदास वांढरे यांनी मानले. व राष्ट्रवंदनेने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.