सरदार पटेल महाविद्यालयात 'पोस्को व सायबर गुन्हे’ विषयावर जनजागृती कार्यशाळा #chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- येथील सरदार पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग द्वारा ‘पोस्को व सायबर गुन्हे’ या विषयावर जनजागृती तसेच गोंडवाना विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना पाठ्यक्रमावर आधारित एक दिवसीय कार्यशाळा पार पडली.

या कार्यशाळेचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी एम. काटकर यांनी केले. या उपक्रमाद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थांना विविध सायबर गुन्हे, त्यांची ओळख, प्रतिबंध आणि गुन्हा घडल्यास करावयाच्या उपाययोजना याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली. कार्यशाळेत सायबर गुन्हे, पॉक्सो कायदा, सुरक्षा, , आपत्कालीन क्रमांकाचे महत्त्व अशा विविध विषयांवर वरिष्ठ विभाग आणि अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश सुमित विजयकुमार जोशी, चंद्रपूर सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी मुजावर अली यांनी मार्गदर्शन केले.



सुमित विजयकुमार जोशी म्हणाले की, POCSO विधेयक संकटाच्या वेळी असुरक्षित मुलांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांची सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी प्रस्तावित आहे. १८ वर्षांखालील बालकांचे लैंगिक छळ आणि शोषण यापासून संरक्षण करण्यासाठी कायदेशीर तरतूद मजबूत करण्यासाठी पोक्सो कायदा तयार करण्यात आला.

सायबर गुन्ह्यांत माहितीची चोरी, इ-मेलच्या माध्यमातून अपशब्द पाठवणे, माहितीचा अवैध वापर, माहितीत सहेतूक फेरफार, ठरवलेली सेवा देण्यास नकार असे अनेक प्रकार आहेत. तसेच मोबाइल नेटसारख्या क्राइम व इंटरनेट बँकिंग यासारख्या गुन्ह्याचे प्रकार भारतात सर्वाधिक आहे. तसेच काही लोक सायबर सुरक्षेविषयी फारसे जागरूक नाहीत केवळ इंटरनेट असेल, तरच गुन्हे घडू शकतात. दिवसेंदिवस वाढता संगणक व इंटरनेटचा वापर आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ ही अतिशय चिंताजनक बाब असून, या गुन्ह्यांना शहरातील तरुणांबरोबरच प्रौढ व्यक्तीदेखील कळत-नकळत बळी पडत आहेत. आपण सायबर गुन्ह्यांचे लक्ष्य होऊ नये, म्हणून अधिकाधिक सतर्कता बाळगणे हाच यावरील मुख्य उपाय असल्याचे मत मुजावर अली यांनी केले.

यावेळी उपप्राचार्य डॉ. स्वप्नील मधमशेट्टीवर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर गोड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. वंदना खनके, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख, डॉ. राजकुमार बिरादार, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग शासन संचालिका डॉ. पुष्पांजली कांबळे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने या कार्यशाळेला उपस्थित होते. यावेळी एनएसएस पाठ्यक्रमावर राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जीनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्यात.