Adv. Wamanrao chatap: बॅनरवरील ॲड. चटप यांच्या फोटोला अज्ञाताने फासले शेण; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Bhairav Diwase

कोरपना:- विधानसभेची रणधुमाळी गाजू लागली आहे. दिवसेंदिवस ॲड. वामनराव चटप यांना मिळणाऱ्या जनतेचा पाठिंबा वाढताना दिसतोय. ॲड. वामनराव चटप यांची प्रचारातली आघाडी बघून विरोधकांचे धाबे दणाणले आहे. ॲड. वामनराव चटप यांचे गडचांदूर शहरातील पोलीस स्टेशन जवळ प्रचार बॅनर लागले आहे. बॅनरवरील ॲड. वामनराव चटप यांच्या फोटोला शेण फासण्याचे कुटील काम अज्ञात व्यक्तीने केले आहे. इतक्या खालच्या स्तराचे विरोधकांचे राजकारण निषेधार्ह असल्याचे म्हणत शेतकरी संघटनेने गडचांदूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे.

तीनदा आमदारकी भूषविणारे ॲड. वामनराव चटप यांचा जनमाणसात मोठा आदर आहे. नागरिक व कार्यकर्ते या घटनेविषयी संतप्त असून रोष व्यक्त करीत आहे.
शेतकरी संघटनेचे विलासराव धांडे, रत्नाकर चटप, नरेश सातपुते, अरुण रागीट, अतुल थोटे, मोरेश्वर अस्वले, अरुण काळे, अविनाश डोहे, अनिल कौरासे, गजानन टेकाम आदींनी याविषयी लेखी तक्रार ठाणेदार यांना दिली असून दोशींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.