Pratibha Dhanorkar: पराभवाचा मोठ्या मनाने स्वीकार पण.....

Bhairav Diwase

चंद्रपूर:- जय पराजय हा राजकारणाचा एक भाग असून विधानसभा निवडणूकीत लोकसभा क्षेत्रातील जनतेने दिलेला कौल मान्य करीत असल्याच्या भावना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

राजकारणात अनेकदा काही चुका न कळत होत असतात. त्या चुका आमच्या हातुनही झाल्या आहेत. मी एक खासदार म्हणून येणाऱ्या साडेचार वर्षांच्या काळात जनेतच्या पाठीशी सदैव उभी राहील. लवकरच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पराभवाची समिक्षा करणार असून भविष्यात गाव, तालुका व जिल्हा पातळीवरील संघटन मजबुतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. जनतेतून निवडून आलेल्या सर्व आमदारांना शुभेच्छा देऊन जात, धर्म, पंत या पलिकडे जाऊन आपण आपल्या क्षेत्रातील विकासाचा पाया मजबुत करावा, अशी आशा बाळगून पुनःश्च एकदा मी माझ्या मतदारुपी माय-बापांचा धन्यवाद व्यक्त करत असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.