Mobile explosion in pocket: मोबाईलचा खिशात स्फोट, शिक्षकाचा जागीच मृत्यू,

Bhairav Diwase

गोंदिया:- गोंदियात चक्क मोबाईलमुळे एक शिक्षकाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली.

शिक्षकाने खिशात ठेवलेल्या मोबाईलचा भयंकर स्फोट झाला. या स्फोटात शिक्षक गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. तर त्याच्यासोबत असलेली व्यक्ती जखमी झाली आहे. ही धक्कादायक घटना गोंदियातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात घडली. सुरेश संग्रामे असं मृत शिक्षकाचं नाव आहे. नत्थु गायकवाड असं जखमी असलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोघेही भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील रहिवासी आहेत. एका कार्यक्रमासाठी गेले असताना अचानक खिशातल्या मोबाईलचा स्फोट झाली आणि ही दुर्घटना घडली. नत्थु यांच्यावर जिल्ह्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संग्रामे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मोबाईलची बॅटरी जास्त गरम झाल्यामुळे स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मोबाईल कोणत्या कंपनीचा होता याची अद्याप माहिती मिळालेली नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.