MKCL ऑलंपियाड मूव्हमेंट परीक्षेचे यशस्वी आयोजन

Bhairav Diwase

पोंभुर्णा:- MKCL ऑलंपियाड मूव्हमेंट परीक्षेचे आयोजन 1 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले होते. या राज्यस्तरीय परीक्षेत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासली जाते आणि त्यांना नवे शैक्षणिक आव्हान व संधी प्रदान केली जाते.

Pritam Institute of Technology, Pombhurna येथे झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात, 6वी वर्गासाठी महाराष्ट्र स्तरावर दुसरा क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.

गुणवंत विद्यार्थी:

1. अंश संतोष राऊत


2. सागर सुशांत मंडरे

या विद्यार्थ्यांचे यश कौतुकास्पद असून त्यांच्या मेहनतीचा आणि मार्गदर्शनाचा गौरव करण्यात आला. शिक्षक, पालक, व शाळेच्या योगदानासाठी विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!