पोलीस मुख्यालयातच आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव अनंत इंगळे असं आहे. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समोर आलं नाही. त्यांची पोलीस मुख्यालयात ड्युटी होती. पहाटेच्या वेळी त्यांनी गळफास घेत जीवन संपवलं.
अनंत इंगळे यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईखांना देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून मृत्यूची नोंद करण्यात आलीय. पोलीस कर्मचाऱ्यानेच मुख्यालयात केलेल्या या आत्महत्येनं बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
बीड शहरातील पोलीस मुख्यालयावर कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने, मुख्यालयाच्या भिंतीलगत आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलीय. अनंत मारोती इंगळे रा. कळंमआंबा ता.केज जि बीड असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.