BJP : भाजपने भाकरी फिरवली; चंद्रपूर जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर

Bhairav Diwase

महानगर अध्यक्षपदी कासनगोट्टूवार तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी हरीश शर्मा!


चंद्रपूर:- राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकांनंतर भाजपने वरिष्ठ नेते रविंद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याऐवजी पक्षीय स्तरावर मोठी जबाबदारी दिली.

🌅
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपने संघटन पर्व अभियान राबवले. त्या माध्यमातून भाजपने तब्बल दीड कोटी सदस्य नोंदणी पूर्ण केली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही रणनीती आखण्यात येत आहे. त्यातच, आता भाजपने राज्यातील जिल्ह्यांसाठी भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे.

🌅
महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आले असून अखेर भाजपकडून नव्या जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपकडून चंद्रपूर जिलाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपचे प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी चैनसुख संचेती यांच्या सहीने भाजपकडून परिपत्रक जारी करत नव्या जिल्हाध्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यात चंद्रपूर ग्रामिण जिल्हाध्यक्षपदी हरीश शर्मा तर महानगर जिल्हाध्यक्षपदी कासनगोट्टूवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.