संविधान चौक राजुरा येथे भगवान गौतम बुद्ध जयंती साजरी

Bhairav Diwase
संविधान चौक राजुरा येथे भगवान गौतम बुद्ध जयंती साजरी 


राजुरा:- आज संविधान चौक राजुरा येथे पुतळा कृती समिती राजुरा तर्फे माहाकारुनिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला,मानवी दु:ख ,दु:खाचा उगम दु:खाची कारणे,आणि निवारण्याचे मार्ग जगाला सगळ्यात प्रथम सांगणारे शांतिदूत आणि सत्यशोधक, भारत भूमीच्या कणाकणात आजही वास करुन असलेले,विश्वात ज्यांच्या नावामुळे आजही भारताची ओळख आहे असे,कर्मकांड नाकारणारे धर्माची व धर्म ग्रंथाची  चिकित्सा करायला सांगणारे पहिले धम्म संस्थापक,बुध्दीवर  विश्वास ठेवणारे,आपल्या अनुयायांना आपल्या विचाराची चिकित्सा करायला लावणारे,देव -स्वर्ग - नर्क आत्मा - पुनर्जन्म यांना नाकारुन सत्कर्माची शिकवण देणारे ज्यांच्या जन्मामुळे ही भारत भुमी पावन झालेली आहे असे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती सकाळी ११वाजता सेवा निवृत्त मंडल अधिकारी वसंत मुन साहेब यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या  मूर्तीला पुष्प वाहुन दिप प्रजलित करून पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले, नंतर माजी नगराध्यक्ष अरुण भाऊ धोटे, सुनील देशपांडे, सुरेश मेश्राम, विजय जुलमे,यांनी भगवान बुध्दाना  पुष्प वाहुन अभिवादन केले , उपस्थित असलेले विनोद बारसिंगे साहेब, सचिदानंद रामटेके साहेब, योगेश करमणकर, गिरजाताई जगताप, दिपाताई करमणकर, रुषी रायपुरे, शामसुंदर मेश्राम, ऑडो,भिमराव दुर्गे, संध्याताई चांदेकर, मिलिंद झाडे, विलास पाटील सर, इंजि, प्रकाश शेंडे साहेब, मुरलीधर ताकसांडे, प्रभुदास वनकर, विठ्ठल धोटे,अभिवादन केले, मानवी करमणकर आणि संच,यांनी सामुहिक बुद्ध वंदना घेतली, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेशभाऊ नळे यांनी केले, तर सर्वांचे आभार सुध्दा रमेशभाऊ यांनी मानले,