चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीत मोठी मुसंडी मारली. पाच आमदार असलेल्या या जिल्ह्यात, भाजप प्रदेश कार्यालयाने जाहीर केलेल्या यादीत जिल्हाध्यक्षाचा उल्लेखच नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चंद्रपूर शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांची नावे अद्यापही प्रतिक्षेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या नावांवर काही वाद किंवा अडचणी निर्माण झाल्या आहेत. चंद्रपूरमध्ये आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यामध्ये जिल्हाध्यक्षपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचे बोलले जात आहे.
आज जाहीर झालेल्या यादीत चंद्रपूर जिल्हाध्यक्षाचे नाव मात्र जाहीर झाले नाही. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.