डिजीटल मिडियाचा जिल्हाध्यक्ष पदी राहुल थोरात तर जिल्हा सचिव पदी केवलसिंग जुनी

Bhairav Diwase
डिजीटल मिडियाचा जिल्हाध्यक्ष पदी राहुल थोरात तर जिल्हा सचिव पदी केवलसिंग जुनी


चंद्रपूर:-  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई वस्ताद संस्थापक संजय भोकरे यांचा मार्गदर्शनात  प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकोडे सरचिटणीस डाॅ.विश्वासराव आरोटे यांचे नेतृत्वात डिजीटल मिडियाचे प्रथम अधिवेशन सांगली येथील निर्णायक व दिशादर्शक नेतृत्व सिध्दार्थ भोकरे यांचा संकल्पनेतून संपन्न झाले. 
    सदरील अधिवेशनात प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमानी यांना प्रदेश उपाध्यक्ष प्रा.महेश पानसे यांचा प्रस्तावाचा मान्यतेने डिजीटल मिडीया चंद्रपूर जिल्हाध्यक्ष म्हणून राजुरा येथील नामवंत पत्रकार ॲड राहुल थोरात तर चिमुर तहसिल येथील निर्भीड पत्रकार केवलसिंग जुनी यांची निवड करण्यात आली.


      प्रसंगी राजुरा येथील चुनाळा विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई चंद्रपुर जिल्हाध्यक्ष यांचा सूचनेनुसार सत्कार सोहळा आयोजित करून नवनिर्वाचित डिजीटल मिडीया जिल्हाध्यक्ष राहुल थोरात सरचिटणीस केवलसिंग जुनी यांना सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ गुलदस्त्या देत सत्कार करण्यात आला. 


      यावेळी  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक ज्येष्ठ नामवंत पत्रकार प्रा.महेश पानसे, राजुरा पत्रकार संघाचे मार्गदर्शक ज्येष्ठ नामवंत पत्रकार प्रा. अनंत डोंगे, संघाचे अध्यक्ष सतिश शिंदे, कार्याध्यक्ष संतोष मेश्राम, उपाध्यक्ष विजय जुलमे,  अंकुश भोंगळे, सहसचिव अनिल गांपवार, संघटक लोकेश पारखी, कोषाध्यक्ष राकेश कलेगुरवार प्रसिद्धी प्रमुख अनिलकुमार गिरमिल्ली सदस्य ओंकार आस्वले कैलास कार्लेकर गौरव कोडापे, मुल सावली अध्यक्ष सतीश राजुरवार, बल्लारपूर अध्यक्ष मनोहर दोदपल्लीवार, गौतम कांबळे, बानोत आदी पदाधिकारी पत्रकार बंधु उपस्थित असता सर्वांन कडून पुढील वाटचालीस करीता शुभेच्छा देण्यात आल्या.