आमदार देवराव भोंगळे यांचा मास्टरस्ट्रोक; गोंडपिपरीत भाजपचा नगराध्यक्ष विराजमान
गोंडपिपरी:- गोंडपिपरी नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा तथा काँग्रेसच्या गटनेत्या सौ. सविता बबलू कुळमेथे यांनी काँग्रेसचे नगरसेवक अनिल झाडे, रंजना रामगीरकर, वनिता देवगडे, सचिन चिंतावार व सारीका मडावी यांचेसह आज सकाळी राजुरा येथे आमदार देवराव भोंगळे यांचे उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार देवराव भोंगळे यांनी सर्वांच्या गळ्यात भाजपचे दुपट्टे टाकून भाजप परीवारात सहर्ष स्वागत केले.
यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, नवनिर्वाचित नगराध्यक्ष अश्विनी तोडासे, राष्ट्रवादीचे नगरसेवक महेंद्रसिंह चंदेल, नगरसेविका मनिषा दुर्योधन आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.
याप्रसंगी आमदार देवराव भोंगळे यांनी सर्वांचे पुढील वाटचालीसाठी अभिनंदन करीत सदिच्छा व्यक्त केल्या. भाजप-महायुती सरकारच्या विकासाच्या विचाराने प्रेरित होऊन आणि मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण सर्वांनी भाजपात प्रवेश केला याचा आनंद आहे. आपल्या पक्षप्रवेशाने गोंडपिपरी नगरात भाजपला निश्चितच फायदा होईल. आपल्या नेतृत्वाखाली गोंडपिपरीकरांच्या सेवेसाठी मी कटिबद्ध आहे. अशी भावना त्यांनी अभिनंदनपर बोलतांना व्यक्त केली.
गोंडपिपरीत भाजपच्या नगराध्यक्ष विराजमान
गोंडपिपरी नगरपंचायतीत आज नगराध्यक्ष पदाची निवडणुक पार पडली; या निवडणुकीत सौ. अश्विनी तोडासे यांची बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याबद्दल त्यांच्या अभिनंदनार्थ शहरातून जल्लोष मिरवणूक ही काढण्यात आली.
या मिरवणुकीत तालुका महामंत्री कोमल फरकाडे, शहराध्यक्ष चेतनसिंह गौर, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष राकेश पुन, सुहास माडूरवार, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा स्वाती वडपल्लीवार, अरूणा जांभुळकर, नगरसेविका मनिषा मडावी, शारदा गरपल्लीवार, माया वाघाडे, तेजस्विता भगत, अनुजा बोनगिरवार, शुभांगी वनकर, प्रकाश राफलवार, रमेश दिंगलवार, शिथिल लोणारे, मनोज वनकर, वैभव बोनगिरवार, पंकज चिलनकर, प्रज्वल बोबाटे, राजु देवगडे, सचिन भोयर आदिंसह गोंडपिपरीतील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.