Accident News: चंद्रपूर जिल्ह्यात ट्रक अपघातात माय लेकीचा मृत्यू

Bhairav Diwase

राजुरा:- बल्लारपूर राजुरा दरम्यान निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात ट्रकने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत राजुरा येथील ज्योती बंडू रागीट (वय 42) व मुलगी सेजल बंडू रागीट (15) जागीच करुण अंत झाल्याची घटना दुपारी 1:00 वाजताच्या सुमारास घडली.


प्राप्त माहितीनुसार राजुरा येथील पेठ वॉर्डातील ज्योती बंडू रागीट (42) व त्यांची मुलगी सेजल बंडू रागीट ह्या दोघीही MH 34 BN 5538 क्रमांकाच्या ड्युएट गाडीने राजुरा येथुन बल्लारपूर कडे जात असताना वर्धा नदीचा पुल ओलांडल्यानंतर जलाराम बाप्पा मंदिराजवळ अज्ञात ट्रक ने दुचाकीला जबर धडक दिल्याने आई व मुलगी जागीच ठार झाल्याची घटनेची माहिती कळताच पोलिस चमू घटनास्थळी दाखल झाली असुन मृतांचे शव उत्तरीय तपासणीकरिता रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.