चंद्रपूर:- प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 25 जुलै ते 26 जुलै, 2025 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.