Pombhurna News : अखेर तो शिवरस्ता झाला मोकळा; चौदा शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला

Bhairav Diwase
पोंभूर्णा:- तालूक्यातील चेक हत्तीबोडी व देवाडा खुर्दची हद्द सांगणारा शिवरस्ता मागील वीस वर्षापासून अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला होता.अतिक्रमणात अडकलेल्या शिवरस्त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतीपुरक कामे करण्यास व ये- जा करण्यास अडथळा निर्माण होत होता.पावसाळ्यात चिखल तुडवत जावे लागत होते.सदर शिवरस्ता खुला करून देण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा निवेदने दिले मात्र रस्त्याचा प्रश्न काही मार्गी लागत नव्हता.अखेर तहसिलदार शेलवटकर यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेत सदर शिवरस्ता मोकळा करून दिला.त्यामुळे त्या चौदा शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला असून शेतीपुरक कामे व ये-जा करण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.


शिवरस्ता,शेतरस्ते, पांदण रस्ते शेतीला पुरक असतात. शेतकऱ्यांच्या समृद्धीचा मार्ग असतात.शेतीपुरक कामे करणे व पिकवलेल्या पिकाला घरी व परिणामी बाजारपेठेत नेण्यासाठी महत्त्वाचा असतो.पण अनेकदा अश्या रस्त्यावर अतिक्रमण केले जाते.गाव नकाशानुसार अतिक्रमित आणि बंद असलेले शिवरस्ते,शेतरस्ते,पांदण रस्ते मोकळे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या होत्या.पोंभूर्णा तहसीलदार यांनी पोंभूर्णा तालुक्यातील तक्रार प्राप्त झालेले शिवरस्ते,शेतरस्ते व पांदण रस्ते मोकळे करून देण्याची विशेष मोहीम दि.६ व ७ आगस्टला राबवण्यात आली.वीस वर्षापासून अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या चेक हत्तीबोडी व देवाडा खुर्दची हद्द असलेला शिवरस्ता तहसीलदार मोहनिश शेलवटकर यांनी प्राथमिकता देत मोकळा करून दिल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.


 यावेळी तहसीलदार मोहनिश शेलवटकर, नायाब तहसीलदार रामकृष्ण उईके,दिपाली आत्राम, मंडळ अधिकारी दिनकर शेडमाके, तलाठी जनार्धन बल्की, धनलाल भोयर, किशोर भोयर, आरती धुर्वे, वृषभ तेलसे, श्रीधर तीवाडे व महसूल विभागाचे अधिकारी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.