राजुरा:- मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानंतर राज्यातील बंजारा समाज देखील आक्रमक झाला असून बंजारा समाजाने एसटी प्रवर्गामध्ये वर्गीकरण करून एसटी प्रवर्ग ब मधून हैद्राबाद गॅझेटनुसार समाविष्ट करण्याच्या प्रमुख मागणीसाठी आज राजुरा येथे बंजारा समाजाकडून भव्य विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो बंजारा बांधव सहभागी झाले होते. बंजारा समाजाने एसटी प्रवर्गामध्ये वर्गीकरण करून एसटी प्रवर्ग ब मधून हैद्राबाद गॅझेटनुसार समाविष्ट करण्याच्या प्रमुख मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर उतरला आहे. यासाठी आज राजुरा येथे बंजारा समाजाकडून भव्य विराट मोर्चा काढण्यात आला होता. मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्यात येणार असून बंजारा समाजाचा देखील बंजारा समाजाने एसटी प्रवर्गामध्ये वर्गीकरण करून एसटी प्रवर्ग ब मधून हैद्राबाद गॅझेटनुसार समाविष्ट करण्याची बंजारा समाजाची मागणी आहे. हजारोच्या संख्येने बंजारा समाजातील महिला व पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते.
या मोर्चात बंजारा समाजाच्या महिला पारंपारिक वेशभूषेत मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. यावेळी समाज बांधवानी आरक्षणाच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली आहे.


