पोंभूर्णा:- तालुक्यातील देवाडा खुर्द येथील एका प्रादेशिक वृत्तपत्रात तालूका प्रतिनिधी म्हणून काम करणारे विजय वासेकर यांना बातमी प्रकाशित करण्याच्या कारणावरून वाटेत अडवून अश्लील शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याबाबत पोंभूर्णा तालुका पत्रकार संघाचे वतीने दि.२६ सप्टेंबरला तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.सदर भ्याड हल्ला लोकशाहीला मारक असून हा प्रकार पत्रकाराच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे.या घटनेची पत्रकारांनी कठोर शब्दात निंदा केली आहे.
विजय वासेकर हे प्रादेशिक वृत्तपत्रात तालूका प्रतिनिधी म्हणून काम करतात दि.२३ सप्टेंबरला दुपारी दोन वाजताच्या सुमारास पोंभूर्णा येथील काम आटोपून देवाडा खुर्द कडे जात असताना देवाडा खुर्दच्या स्वागत गेट जवळ कुमोद घोंगडे यांनी विजय वासेकर यांची गाडी अडवून "आम्हची वनसमीतीची बातमी का छापलास" असे म्हणून अश्लील शिवीगाळ व जिवेनीशी मारून टाकण्याची धमकी देत हल्ला करण्यासाठी जवळ आला.अश्यात जीव वाचवण्यासाठी विजय वासेकर हे गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या दुचाकीने निघून आले असता कुमोद घोंगडे पुन्हा दुचाकीने त्याच्या मागे येऊन शिवाजी महाराज चौकात पुन्हा अश्लील शिवीगाळ व जिवेनीशी मारून टाकण्याची धमकी दिली.यावेळी चौकात लोकं असल्याने अनुचित प्रकार घडला नाही.मात्र सदर प्रकरणामुळे विजय वासेकर यांच्या जिवाला धोका असल्याने त्यांना संरक्षण देण्यात यावे.व पत्रकार संरक्षण कायदा (२०१७) अंतर्गत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या कुमोद घोंगडे याचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी पोंभूर्णा पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार मोहनिश शेलवटकर यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री यांना करण्यात आली आहे.
यावेळी अध्यक्ष पी.एच.गोरंतवार,उपाध्यक्ष जीवनदास गेडाम,सचिव आशिष कावटवार,सहसचिव पंकज वडेट्टीवार, कोषाध्यक्ष दिलीप मॅकलवार,सदस्य- निलकंठ ठाकरे,
बबनराव गोरंतवार,भुजंग ढोले, इक्बाल कुरेशी, सुरेश कोम्मावार, विकास शेडमाके यांची उपस्थिती होती.
------------
विजय वासेकर यांनी दि.११ आगस्टला बोगस वनसमीतीची जी बातमी प्रकाशित केली त्याचा वचपा काढण्यासाठी सदर भ्याड हल्ला करण्यात आला आहे. पत्रकार सामाजिक प्रश्न,भ्रष्टाचार,अन्याय उजेडात आणण्याचा प्रयत्न करतो.समाजाचा आरसा व लोकशाहीचा चौथा स्तंभ अशी ओळख असलेल्या पत्रकारावर भ्याड हल्ला व जिवेनीशी मारण्याची धमकी देणे हि निंदनीय बाब असल्याचे यावेळी पत्रकार संघाकडून वक्तव्य करण्यात आले.



