पोंभुर्णा:- गंगापूर नवीन येथील शेतकऱ्या सोबत घेऊन सुधीर मुनगंटीवार आमदार बल्लारपूर विधानसभा यांना माहिती दिली असता लगेच जिल्हाधिकारी यांना भाऊंनी सूचना करीत गंगापूर नवीन येथील शेतकऱ्यांना संगणीकृत सातबारे देण्यासाठी सूचना केली. त्यासाठी आज गंगापूर येथील शेतकऱ्यांना घेऊन शेलवटकर तहसीलदार पोंभुर्णा यांना नवीन गंगापूर येथील शेतकऱ्यांचे सातबारा संगणकीकृत करून देण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले.
नवीन गंगापूर येथील सातबारे संगणकीकृत भेटत नसल्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या योजने पासून या शिवरातील शेतकरी वंचित आहेत.
निवेदन देताना अल्का आत्राम प्रदेश महामंत्री, नारायण बोन्डे, मोरेश्वर राऊत, सुधाकर शिंदे, धनराज वाकूडकर, गिरीधर खेडेकर, किशोर पुप्पलवार, दिवाकर शिंदे, संजय मराठे, चिंतामणी खेडेकर, निलेश सातरे, केशव शिन्दे, रणपती वडस्कर उमेश सिडाम आणि सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते.