चंद्रपूर:- येथील सरदार पटेल महाविद्यालयात भूगोल विभागाकडून पीएम उषा स्कीम अंतर्गत तज्ञांचे विचार कौशल्य यावर माहिती विद्यार्थ्यांना मिळावी करिता जीआयएस व रिमोट सेन्सिंग या भागावरील निर्धारित अभ्यासक्रमाच्या आधारावर घेतलेल्या वर्कशॉपला 27 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या या सत्रातील भूगोल विषयाच्या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या विषयावर विविध चर्चासत्रात एकूण चार सत्रातील 30 विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाचे व प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन सोहळा दिनांक 14 ऑगस्ट 2025 ला पार पडला होता त्यानंतर 27 सप्टेंबर 2025 ला या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. Chandrapur
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम. काटकर उपस्थित होते तर मंचावर उपस्थित मान्यवरात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, भूगोल विभाग प्रमुख डॉ. वनश्री लाखे डॉ. निखिल देशमुख व प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले श्री सुनील चांदेकर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.वनश्री लाखे यांनी केले तर या कार्यक्रमाचे संचालन डॉ.दिपाली दांडेकर यांनी केले व आभार प्रदर्शन प्राध्यापक सिद्धांत कांबळे यांनी केले. Sardar Patel Mahavidyalaya Chandrapur



