संघर्षमय प्रवासातून यशाचं शिखर!
चंद्रपूरच्या मातीत अनेक जिद्दी तरुण-तरुणी आपल्या कर्तृत्वाने जिल्ह्याची मान उंचावत आहेत. आज आपण अशाच एका प्रेरणादायी यशोगाथेबद्दल जाणून घेणार आहोत, जिने आपल्या आईचे कष्ट आणि त्याग सार्थ ठरवत पोलीस दलात मानाचे स्थान मिळवले आहे. ही यशोगाथा आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील तांबडी तुकडोजी नगर येथील सुकन्या, सुषमा प्रिया बंडू खाडे हिची. Chandrapur police
🚨पोलीस व अन्य भरती बातम्या 2 🚔
आपल्या या यशाचं संपूर्ण श्रेय सुषमा हिने अत्यंत भावूक होऊन आपल्या आईला समर्पित केलं आहे. मी आज इथपर्यंत पोहोचले आहे, ते केवळ माझ्या आईने दिलेल्या शिक्षणामुळे आणि मार्गदर्शनामुळे! मला घडवण्यात माझ्या आईचा सिंहाचा वाटा आहे. माझ्या यशाचं संपूर्ण श्रेय माझ्या आईलाच जातं." डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईमुळेच शिक्षणाचे हक्क मिळाले आणि समाजात सन्मानाचे स्थान मिळाले, अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली. Police
आईच्या अपार कष्टांना सलाम करत, तिचं स्वप्न साकारणाऱ्या सुषमा खाडे हिचा हा प्रेरणादायी प्रवास तालुक्यातीलच नव्हे, तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण-तरुणींसाठी एक नवा आदर्श आणि प्रेरणास्रोत ठरला आहे.