पोंभूर्णा:- नवसाला पावणारी अशी ओळख असलेली पोंभूर्ण्याची माताराणी गेली ४० वर्षांपासून पोंभूर्ण्यासह तालुक्यात ख्याती पसरली आहे. घटस्थापनेपासून ते कोजागरी पौर्णिमेपर्यंत भाविक माताराणीची मनोभावे पूजा करून आराधना करतात.नवरात्र उत्सव काळात केलेला नवस फेडण्यासाठी व मातेच्या दर्शनासाठी परिसरातील भाविक भक्त दुरवरून मोठ्या संख्येने येत असतात. माताराणीच्या आरतीसाठी व ओटी भरायला महिलांची अफाट गर्दी असते. पोंभूर्णा शहरातील जुना बाजार येथील दर्शन दुर्गा मंडळ मागील ४० वर्षांपासून पोंभूर्ण्याची माताराणी दुर्गादेवीची स्थापना करीत आहे.
पोंभूर्ण्याची माताराणी दुर्गादेवी नवसाला पावणारी,सर्वांचे दुःख हरणारी अशी आस्था भक्तगणांना आहे.गेली ४० वर्षांपासून मातेची ख्याती सर्वदूर पसरली आहे.यावेळी दर्शन दुर्गा मंडळाने दरबार तुळजाभवानी मातेच्या मंदिर देखाव्याची तयार केलेली प्रतिकृती आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे.देखावा पहाण्यासाठी भक्त भाविकांची गर्दी उसळत आहे. धार्मिक विधी व परंपरेप्रमाणे देवीची पूजा, धार्मिक विधी केले जातात. सध्या भाविक मोठ्या संख्येने येत आहेत.नवरात्र उत्सवात पंधरा दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. पोंभूर्ण्याच्या नवसाला पावणाऱ्या माताराणीचे दर्शन घेण्यासाठी दर्शन दुर्गा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे.
मातेचा विसर्जन दि.०६/१०/२०२५ रोज सोमवार ला दु. २.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत असणार आहे भाविक भक्तांनी या दर्शनाचा लाभ घेण्याचे केले आवाहन.
महाआरती करीता माजी मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार देवराव दादा भोंगळे, तहसीलदार मोहनिश शेलवटकर, तहसीलदार रेखा वाणी, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले यांना आरतीचा मान देऊन त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली आहे.