Police Bharati: भरती प्रक्रियेदरम्यान वेबसाइट हॅक होणे किंवा तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी वेबसाईटची चाचणी!

Bhairav Diwase

मुंबई:- महाराष्ट्र पोलीस दलात १५,६३१ रिक्त पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. गृह विभागाने यासाठी एक नवीन पोर्टल कार्यान्वित केले असून, ७ ऑक्टोबर २०२५ पासून या पोर्टलवर अर्ज सादर करण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. अशी माहिती वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली. परंतु वेबसाईटवर काम सुरू आहे. तारखेत बद्दल होणार आहे. 


सध्या गृह विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर या संदर्भात काम सुरू आहे. भरती प्रक्रियेदरम्यान वेबसाइट हॅक होणे किंवा तांत्रिक अडचणी येणे टाळण्यासाठी ही चाचणी घेतली जात आहे. त्यामुळे, जाहिरात प्रसिद्ध होण्यापूर्वीच अर्ज स्वीकारण्याची तारीख जाहीर झाल्याने उमेदवारांमध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता, तो दूर करण्याचा प्रयत्न गृह विभागाकडून केला जात आहे. या संदर्भात अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी गृह विभागाच्या वेबसाइटवर लक्ष ठेवावे.