Fake police recruitment portal exposed! :बनावट पोलीस भरती पोर्टलचा पर्दाफाश!

Bhairav Diwase
उमेदवारांनी कोणतीही माहिती भरू नये; महा आयटीचे स्पष्टीकरण

पुणे:- नौकरीच्या शोधात असलेल्या तरुणाईला आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या उद्देशाने एक बनावट महाराष्ट्र राज्य पोलीस भरती पोर्टल (Fake Maharashtra State Police Recruitment Portal) उघडकीस आले आहे. ज्या पोर्टलची लिंक testmsp.mahaitgov.in/Forms/Home.aspx अशी आहे, ते पोर्टल सध्या चर्चेत आहे. हे पोर्टल पोलीस भरती प्रक्रिया २०२४-२०२५ साठी अर्ज स्वीकारत असल्याचा दावा करत होते. मात्र आमच्या पडताळणीमध्ये ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

🚨पोलीस व अन्य भरती बातम्या 2 🚔

या बनावट पोर्टलमुळे अनेक इच्छुक आणि तयारी करणारे उमेदवार संभ्रमात पडले होते. मात्र, सत्य बाहेर आणण्यासाठी महा आयटी (Maha IT) आणि पुणे सायबर सेलशी (Pune Cyber Cell) संपर्क साधून याबाबतची माहिती घेतली, ज्यात धक्कादायक खुलासे झाले आहेत.


पुणे सायबर सेलचा इशारा?


आम्ही या बनावट पोर्टलची नोंद घेतली आहे आणि यामागे कोण आहे याचा तपास सरु करण्यात आला आहे. ही एक प्रकारची 'फिशिंग' किंवा माहिती चोरण्याचा प्रयत्न असू शकतो उमेदवारांनी अशा ठिकाणी वैयक्तिक माहिती, आधार क्रमांक किंवा बैंक डिटेल्स भरू नयेत. माहिती दिल्यास आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. केवव्ठ अधिकृत सरकारी वेचसाइट्स आणि पोलीस विभागाच्या सूचनांवरच विद्यास ठेवावा.
- पुणे सायबर सेल


महा आयटी (Maha IT) यांचा स्पष्ट नकार?

"सदर् पोर्टल (testmsp.mahaitgov.in) हे आमचे नाही आणि हे पर्णपणे बनावट आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती प्रक्रिया सुरु करावी असा कोणताच प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. सर्व उमेदवारांनी अशा कोणत्याही बनावट माहितीवर विश्वास ठेव नये आणि अधिकत सूचनांची प्रतीक्षा करावी, "नेहमी mahait कडूनच राबविली जाते. परंतु सध्या तरी कोणताच अधिकृत प्रस्ताव आलेला नाही आणि टेस्टिंग स्वरुपात पोलीस भरतीचे कोणतेच पोर्टल वर आमच्याकडून प्रमाणे पोलीस भरती प्रक्रिया हि MahalT काम सुरु झालेले नाही. पोलीस भरतीची अधिकृत वेबसाईट https://www.mahapolice.gov.in


निष्कर्ष आणि उमेदवारांना आवाहन

या बनावट पोर्टलच्या माध्यमातून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना फसवण्याचा डाव उघड झाला आहे. सर्व सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येते की त्यानी केवळ महाराष्ट्र पोलीस दलाच्या अधिकृत वेवसाइट्स आणि नामवंत वृत्तपत्रीमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींवरच विश्वास ठेवावा. महा आयटी आणि पूणे सायबर सेलने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पोलीस भरती २०२४-२०२५ सुरू झालेली नाही. या बनावट पौर्टल्सपासून दर राहन कोणत्याही प्रकारची माहिती भरू नये आणि फसवणूक झाल्यास त्वरित सायबर सेलकडे तक्रार नोंदवावी.