WhatsApp Chat Box: नो टेन्शन..! निराधार योजनेचे काम घरबसल्या करता येईल

Bhairav Diwase
तहसिल कार्यालयाचे अधिकृत व्हॉट्स ॲप चॅटबाॅट नागरिकांच्या सेवेत

पोंभूर्णा:- निराधार योजनेची माहिती पाहिजे, निराधार योजनेचे फाॅर्म भरायचे आहेत, निराधार योजनेचे अर्ज कसे व कुणाकडे करायचे, त्रृटीची कागदपत्राची पुर्तता कशी करायची,
व योजनेचे तक्रार निवारण कसे करायचे, वयोवृद्ध असल्याने तहसील कार्यालयात येता येत नाही आता याची अजिबात चिंता करायची नाही. निराधार योजना व आदी उपलब्ध योजनांची व्हाॅट्स ॲप चॅटबाॅटच्या माध्यमातून माहिती घेता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना सर्व माहिती एका क्लिकवर, वेळेची बचत करून, प्रत्यक्ष कार्यालयात न येता मिळू शकते. पोंभूर्णा तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना शाखेच्या अधिकृत व्हॉट्स ॲप चॅटबॉटचे लोकार्पण २४ सप्टेंबरला माजी वने,व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.


पोंभूर्णा तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना शाखेच्या अधिकृत व्हॉट्स ॲप चॅटबोटचे लोकार्पण करण्यात आले.यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, तक्रार निवारण सुविधा आदी उपलब्ध योजनांची व्हाट्सअप चॅटबोटच्या माध्यमातून माहिती घेता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना सर्व माहिती एका क्लिकवर, वेळेची बचत करून, प्रत्यक्ष कार्यालयात न येता मिळू शकते. नागरिकांनी 9403005489 या क्रमांकावर मेसेज केल्यास योजना संबंधी माहिती सहज मिळेल जी त्यांच्यासाठी उपयुक्त आणि परिणामकारक ठरू शकते.


सदरील 9403005489 या वाट्स ॲप क्रमांकावर मेसेज केल्यास लगेच योजनेसंदर्भात माहिती व सहाय्य प्रदान करण्याची माहिती येते व त्यानंतर तिथे असलेल्या माहितीचा क्रमांक टाईप केल्यानंतर संबंधित योजनेची माहिती ज्यात अर्जाचा नमुना,आवश्यक कागदपत्रे,पात्रता,मिळणारा लाभ व नमुद केलेल्या कागदपत्रांसह अर्ज भरून पीडिएफ स्वरुपात वाट्स ॲप वर पाठविल्यास अर्जाची छाननी करून तो अर्ज मंजूर करण्यात येणार आहे.एवढेच नव्हे तर असलेल्या त्रृटीची पुर्तताही यावरून करता येईल.


निराधार योजनेसंदर्भात वृद्ध,महिला,दिव्यांग यांना तहसील कार्यालयात येण्याजाण्याचा होणारा त्रास लक्षात घेता पोंभूर्णा तहसिल कार्यालयाचे संजय गांधी निराधार योजना शाखेच्या अधिकृत व्हॉट्स ॲप चॅटबाॅट नागरिकांच्या सेवेत रुजू करण्यात आले आहे.हि योजना नागरिकांसाठी २४×७ उपलब्ध राहणार आहे.याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.
मोहनिश शेलवटकर
तहसीलदार पोंभूर्णा