चंद्रपूर:- राज्य निवडणूक आयोगाकडून नुकतीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायत यांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
त्यानुसार राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान होईल. तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल.
चंद्रपूर जिल्ह्यातील १० नगरपरिषद व १ नगरपंचायत
- बल्लारपूर
- भद्रावती
- भिसी (न.पं.)
- ब्रह्मपूरी
- चिमूर
- गडचांदूर
- घुग्घुस
- मूल
- नागभीड
- राजूरा
- वरोरा



