Chandrapur News: चंद्रपूर मनपा निवडणूक जाहीर: १७ प्रभागांतील ६६ जागांसाठी होणार चुरस

Bhairav Diwase

चंद्रपूर:- राज्य निवडणूक आयोगाने दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी चंद्रपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार, चंद्रपूर महानगरपालिका मतदार संघात दिनांक १५ जानेवारी २०२६, गुरुवार रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेलावधीत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. ही माहिती मनपा आयुक्त अकुनुरी नरेश यांनी पत्रकार परिषदेत दिली.


महत्त्वाचे आकडे:

एकूण प्रभाग 17

निवडून द्यायच्या उमेदवारांची संख्या 66

एकूण मतदार केंद्राची संख्या 355

पुरुष मतदार संख्या:- 1 लक्ष 49 हजार 609

महिला मतदार संख्या 1 लक्ष 50 हजार 354

एकूण मतदारांची संख्या 2 लक्ष 99 हजार 94

इतर मतदार संख्या 31

दिव्यांग पुरुष मतदार संख्या:- 532

दिव्यांग महिला मतदार संख्या:-275

एकूण दिव्यांग मतदार संख्या:- 807


विशेष व्यवस्था:

मनपा आयुक्त अकुनुरी नरेश यांनी सांगितले की, मनपा क्षेत्रातील प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांच्या मागणीनुसार व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे.


नियंत्रण कक्ष:

निवडणूक प्रक्रियेवर योग्य देखरेख आणि नियंत्रण राखण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेत संपर्क नियंत्रण कक्ष, प्रसारमाध्यमे सनियंत्रण कक्ष, वेबकास्टिंग सनियंत्रण कक्ष तसेच विविध यंत्रणा कक्ष स्थापन करण्यात येत आहेत.


आयुक्त नरेश यांचे आवाहन:

यावेळी बोलताना मनपा आयुक्त अकुनुरी नरेश यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की, त्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावावा आणि देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवावा.