चंद्रपूर:- घुग्घुस येथून जवळच असलेल्या घुग्घुस चंद्रपुर मार्गावरील महाकुर्ला गावात एका 24 वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
महाकुर्ला गावात एक 24 वर्षीय विवाहित महिला आरोपी विक्रम रघुबल पाझारे (33) रा. महाकुर्ला यांच्या शेतात मजुरीचे काम करीत होती. आरोपी विक्रम रघुबल पाझारे यांनी तिला स्वतःचा जिव देऊन तुझ्यावर नाव आनतो अशी धमकी देत 10 महिन्यापासून तिचे लैंगिक शोषण केले.
हेही वाचा:- अमराई येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग.
https://www.adharnewsnetwork.com/2020/12/blog-post_28.html?m=1
त्याच्या त्रासला कंटाळुन सोमवारला घुग्घुस पोलीस स्टेशन गाठुन आरोपी विक्रम रघुबल पाझारे यांच्या विरुद्ध तक्रार दिली. पिडीत विवाहित महिलेच्या तक्रारीवरुन घुग्घुस पोलीसांनी कलम 376 (2) एन 506 गुन्हे दाखल करुन सोमवारलाच रात्री दरम्यान अटक केली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. पुढील तपास पो.नि.राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात सह.पो.नि.मेघा गोखरे करीत आहे.
हेही वाचा:- महाकुर्ला येथे विवाहीत महीलेचे लैंगिक शोषण.
बातमी संकलन:- पंकज रामटेके