Top News

परळीची तरुणी, पुण्यात आत्महत्या, विदर्भातल्या मंत्र्याचं कनेक्शन?

चौकशीसाठी भाजप आक्रमक.
Bhairav Diwase.    Feb 11, 2021
पुणे:- चार दिवसांपूर्वी (7 फेब्रुवारी) पुण्यात एका तरुणीनं आत्महत्या केली आहे. पुजा चव्हाण असं तरुणीचं नाव असून ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत रहात होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर ह्या आत्महत्येशी विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली आहे. आता तर त्यासाठी भाजपनं रितसर तक्रार दाखल केली आहे. 

नेमकी घटना काय?

मुळची परळीची असलेली 22 वर्षाची पुजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री 1 च्या आसपास तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पुजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.

22 वर्षीय तरुणीची आत्महत्या; तर्कवितर्कांना उधाण.

भाजपकडून आता रितसर तक्रार पुजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणी भाजपच्या महिला नेत्या आणि आघाडी आता आक्रमक झाली आहे. पुजाच्या आत्महत्येला कारण ठरलेल्याची चौकशी करावी अशी मागणी वानवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तसं रितसर निवेदनही देण्यात आलं आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनाही चौकशीची मागणी करणारं निवेदन भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष अर्चना पाटील यांनी दिलं आहे.
TV9 मराठी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने