तलवारीच्या वाराने जखमी झालेल्या संदीपचा अखेर मृत्यू. #chandrapur #Ballarpur #Death

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
बल्लारपूर:- गोळीबार प्रकरण ताजे असतांना बल्लारपूर शहरात पुन्हा टोळी युद्ध सुरू झाले असून 23 जुलैला रात्री 8 वाजेदरम्यान बालाजी वार्डात संदीप उर्फ बोग्गा सुरेश दवंडेवार रा. महाराणा प्रताप वार्ड यांचेवर 4 ते 5 जणांनी तलवारीने हल्ला केला. #chandrapur
या हल्ल्यात संदीप हा गंभीर जखमी झाला होता, जखमी संदीप ला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले, मात्र काही दिवसांनी त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले होते, उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने संदीपला नागपूर रेफर करण्यात आले होते, मात्र 15 दिवस संदीप ने मृत्यूशी झुंज दिली व अखेर त्याची प्राण ज्योत मावळली. #Ballarpur
सूत्राद्वारे मिळालेल्या माहितीनुसार संदीप हा आपल्या मित्रांसोबत बालाजी वार्ड येथे बसून होता, मात्र त्यावेळी संदीपने आपल्या मित्राला सिगारेट आणण्यासाठी दुकानात पाठविले नेमकं त्याचवेळी युवकांच्या घोळक्याने अचानकपणे संदीपवर तलवारीने हल्ला केला होता. पोलिसांनी या प्रकरणी सर्व आरोपींना अटक केली असून आता त्यांचेवर हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. #Adharnewsnetwork
संदीप व त्याला मारणारे मारेकरी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, आता हा वाद पुढे काय रूप धारण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.