Top News

चंद्रपूरच्या बांबू राख्यांची युरोपवारी. #Chandrapur #Bamboorakhi


झोपडपट्टीतील महिलांच्या हाताला मिळतंय काम.
चंद्रपूर:- चंद्रपूरच्या बंगाली पॅम्प झोपडपट्टी भागात राहणाऱ्या बांबू कलावंत मीनाक्षी मुकेश वाळके आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी बनवलेल्या राख्या युरोपातील देशांमध्ये पोचल्या आहेत. यातून झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. लॉकडाऊनमध्ये आर्थिक संकटाशी तोंड देणाऱ्या महिलांना राखीने बळ दिले आहे. बांबूपासून पर्यावरणपूरक राख्या बनवणाऱ्या मीनाक्षी आणि त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे. #Chandrapur #Adharnewsnetwork
कुठलाही वारसा किंवा पाठबळ नसताना मीनाक्षी वाळके यांनी अभिसार इनोव्हेटिक्ज नावाचा सामाजिक उद्यम सुरू केला. झोपडपट्टीतील, ग्रामीण भागातील मुली आणि बायकांना प्रशिक्षण देऊन रोजगार देता देता त्यांचे काम वाढत आहे. महिलांना आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी करणे हा त्यांचा हेतू आहे. मे महिन्यापासून या महिलांनी राख्या बनवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. त्या बांबूच्या राख्यांचे काम घरूनही करतात.#Bamboorakhi
या राख्यांना देशविदेशातून मागणी आहे. इंग्लंड, स्वीडन, नेदरलँड, पॅनडा, फ्रान्स आणि स्वित्झलँड अशा देशांत बांबूच्या राख्या पोचल्या आहेत. स्वित्झलँडच्या सुनीता कौर यांनी मीनाक्षी यांच्या बांबू राखींसह इतरही वस्तू तेथे विक्रीकरता मागवल्या आहेत. स्वीडनचे सचिन जोंनालवार यांच्यासह लंडनच्या मीनाक्षी खोडके यांनीसुद्धा त्यांच्या ग्लोबल बाप्पा शो रूमकरिता राख्यांची खरेदी केली आहे.
बांबूच्या इकोप्रेंडली राख्यांमध्ये प्लॅस्टिकचा जराही वापर नाही. या राख्यांचे वैशिष्टय़ म्हणजे सजावटीसाठी खादी धाग्यासह तुळशी मणी आणि रुद्राक्ष यांचा वापर केला जातो. यातून स्वदेशी, संस्कृती आणि पर्यावरण संदेश यांचा प्रेरक मेळ घालण्याचा प्रयत्न केलाय, असे मीनाक्षी वाळके यांनी सांगितले.
लॉकडाऊनमध्ये मीनाक्षी आणि त्यांच्या टीमचे मोठे नुकसान झाले. दीड वर्षांपासून कामकाज ठप्प झाले. प्रदर्शनासाठी बनवलेला दीड ते दोन लाखांचा हस्तकाशल्याचा साठा पडून राहिला. मात्र आता राखी बनवण्याच्या कामांनी महिलांना आधार दिला. राख्या बनवण्याचे लक्ष्य गाठता आले नसले तरी 25 हजारांपर्यंत राख्या त्या तयार करू शकल्या.

साभार......

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने