Top News

राज्यातील १२ कोटी जनतेला शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठा करुन देणाऱ्या 820 कर्मचारी यांचे भवितव्य धोक्यात. #Water

आरोग्यच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणाऱ्या पाणी गुणवत्ता तपासणीच्या कामाचे खाजगीकरण करण्याचा शासनाचा डाव.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- राज्यात ग्रामीण आणि शहरी भागात जनतेला शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे म्हणुन आरोग्य च्या दृष्टीने 2012-13 मध्ये आरोग्य विभागाकडुन प्रत्येक दोन तालुक्या मध्ये एक प्रयोगशाळा व जिल्हा स्तरावर एक अशा एकूण १४८पाणी तपासणी प्रयोगशाळा स्थापन झाल्या होत्या. मान्यता प्राप्त बिंदुनामवली नुसार सर्व पदे कार्यरत आहेत. परंतु 2015 साली शासनाने या सर्व प्रयोगशाळा व मनुष्यबळ आहे असे भुजल सर्वेक्षण आणि विकास यंञणाकडे वर्ग करण्यात आले.
 ही एक यंञणा असुन या विभागात आरोग्य च्या दृष्टीने एक ही अधिकारी मार्गदर्शन करण्यास सक्षम नव्हते तरी देखील सर्व जबाबदारी आमच्या कर्मचारी यांनी घेऊन प्रत्येक गावात -तालुक्यात जिल्हाच्या ठिकाणी कार्यशाळा - पाणी विषयी मार्गदर्शन करुन 2015 पासुन साथरोग आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आले. राज्यात ऐकुण १८२ प्रयोगशाळा आहेत व 820 कर्मचारी आहेत.
त्याच बरोबर खाजगी शुल्क भरुन पाणी तपासणी करुन शासनाच्या तिजोरीत लाखो महसुल पण जमा करत आहोत. विशेष म्हणजे मागील 8 वर्षापासुन सेवा देत असुन जिल्हा प्रयोगशाळा स्वता:च्या मालकी जागेत नवीन बांधकाम करुन त्या सर्व जिल्हा प्रयोगशाळा भारतातील सर्वात जास्त NABL मानांकन देखील झाल्या आहेत. केवळ याच कर्मचारी यांनी दिवस राञ मेहनत करुन केल्या आहेत.
या सर्व प्रयोगशाळा अत्यावश्यक सेवेत असुन या कर्मचारी यांनी कोविड महामारी च्या काळात 24 तास सेवा दिल्या व काही कर्मचारी यांनी जीव सुद्धा गमवला आहे.
2013 पासुन नाशिक -पुणे -नागपुर अशा ठिकाणी या कर्मचारी यांनी शासना कडून दिलेले ट्रेनिंग घेतले शासनाचे करोडो रु.खर्च झाला असुन हे अनुभवी कर्मचारी आहेत.
वर्षाकाठी शासनाचा करोडो रुपये या जनतेला शुध्द पाणी मिळावे म्हणुन खर्च केला गेला जातो मग खाजगीकरण का व कशामुळे असा प्रश्न उद्दभवतो. या कार्यरत कर्मचारी यांनी सुरवातीला खुप कमी पगारात काम करुन जनतेच्या आरोग्य च्या दृष्टीने काम केले व आता केवळ शासनाचा जल जिवन मिशन अंतर्गत आलेला निधी उचल्यासाठी या सर्व प्रयोगशाळा व कर्मचारी यांचे खाजगीकरण करण्याचा अट्टाहास केला जात आहे असे बोलले जाते .
  खाजगीकरण करुन कंपनी मालकाला व संबंधीत अधिकारी यांची दिवाळी होईल पण आज पर्यत जिवाचे रान करुन मेहनत करुन या प्रयोगशाळा NABL केल्या व साथरोग आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला त्या कर्मचारी यांचे भवितव्य  चे काय?
🟥
  तसेच जनेतेच्या शुद्ध व स्वच्छ पाणी मिळण्याचे काय ?? 
   केवळ पैशासाठी हा जनतेच्या आरोग्यशी मांडलेला खेळ आहे.
     सर्व कार्यरत कर्मचारी यांचे भवितव्य धोक्यात असुन संघटना च्या पदाधिकारी यांनी सामान्य प्रशासन, संबंधित पा.पु.मंञीसाहेब पा.पु.सचिव साहेब Gsda संचालक साहेब यांना भेटून चर्चा करुन  निवेदन देऊन व विनंती केली तरी देखील उच्च अधिकारी  खाजगीकरण चे पञ काढत आहेत.
 यामुळे सर्व कर्मचारी मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वयाची 40 ओलांडली पुढे भवितव्य काय असेल हा प्रश्न उद्धभवत आहे. खाजगीकरण करु नये असे जिल्हा स्तरावरचे अधिकरी पञ देत आहेत. तरी यांना डाववले जातेय.
       जर ही भु.स.वि. यंञणा या प्रयोगशाळा व कर्मचारी संभाळण्यास किवा यांची जबाबदारी घेण्यास,सक्षंम नसेल तर 2013 ला ज्या आरोग्य विभागाने पदस्थापना केली होती तिकडे वर्ग करण्यात याव्यात अशी मागणी होत आहे.
    या वर संबंधित प्रशासन व शासन यानीं वेळीच दखल न घेतल्यामुळे महा.राज्य पाणी गुणवत्ता प्रयोगशाळा कर्मचारी संघटना नाईलाजास्तव लोकशाही मार्गाने मागण्या पुर्ण होण्या करीता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

तसेच भुजल सर्वेक्षण आणि विकास यञंणा या प्रयोगशाळा व कर्मचारी संभाळण्यास सक्षम नसेल तर प्रयोगशाळा सुरु करुन सक्षमपणे संभाळणार्या आरोग्य विभागाकडे सदर  प्रयोगशाळा परत वर्ग करण्याची मागणी संघटने चे अध्यक्ष श्री.शहाजी नलावडे,सचिव -आशिष झगडे ,उपाध्याक्ष-कपिल गुजर व अतुल पचंभाई ,विठ्ठल कोरे,भरत घुगे यांनी केली.#Water

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने