Click Here...👇👇👇

महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ सावली तर्फे जिबगांव,लोंढोली, साखरी, सिर्सि येथे मास्क वाटप

Bhairav Diwase
जिबगांव, लोंढोली, साखरी, सिर्सि या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, बैंक, अंगणवाडी व दिव्यांग व्यक्ती यांना मास्कचे वाटप 
Bhairav Diwase.  April 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सावली तालुका प्रतिनिधी) मोनिका दि भुरसे, साखरी 
 सावली: सावली तालुक्यातील अनेक गावामध्ये 'एक हात सहकार्याचा' हा उपक्रम महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ सावलीतर्फे मुन्नाभाऊ स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली राबविल्या जात आहे. जिबगांव, लोंढोली, साखरी, सिर्सि या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, बैंक, अंगणवाडी व दिव्यांग व्यक्ती यांना मास्कचे वाटप करण्यात आले. सध्या कोरोना व्हायरस ने जगाला भयभीत करून टाकले आहे. या कोरोना विषाणू पासून कोणीही मोकळा श्वास घेण्यास असमर्थ ठरला आहे. यावर शासनाने अनेक उपाययोजना अमलात आणल्या जात आहे. घराच्या बाहेर न निघणे,एकमेकांपासून दूर राहणे,वारंवार हात स्वच्छ धुणे,खोकलतांना तोंडावर रुमाल किंवा हात आणणे असे अनेक उपाययोजना कोरोना या विषाणूला रोखण्यासाठी करतांना दिसून येत आहे.
या मास्क वाटप कार्यक्रमाच्या माध्यमातून कोरोना व्हायरस बाबतीत तालुक्याच्या जनतेला माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मागील काही दिवसापासून सावली तालुक्यातील अनेक गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र व भटके लोकांच्या तांडा वस्तीत महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ सावली तर्फे येथील कर्मचारी व रुग्णांना  तथा भटके लोकांना मास्क चे वितरण करण्यात आले.  यावेळेस  महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघांचे सदस्य राकेश गोलेपल्लीवार व देवाजी बावणे यांनी आरोग्य केंद्र,ग्रामपंचायत, अंगणवाडी तसेच बाहेर राज्यातून आलेले गोसाई खुर्द खुर्द पाणी प्रकल्प तर्फे पाईप लाईन टाकणारे मजूर व गावातील नागरिकांना मास्क देऊन जनजागृती केली.महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ सावलीचे अध्यक्ष मुन्नाभाऊ स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यात सर्वं सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना,मजुर व दिव्यांग व्यक्ती इत्यादि लोकांना मास्क देऊन जनजागृती करण्याचे काम संघातील पत्रकार सेवाभावी स्वरूपाने करीत आहेत.