Click Here...👇👇👇

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मुल शहरात गरीब व गरजूंना श्रीराम धान्‍य प्रसादाच्‍या किट्सचे वितरण

Bhairav Diwase
गरीब व गरजू नागरिकांना या किट्सच्‍या माध्‍यमातुन मदतीचा हात
Bhairav Diwase.  April 07, 2020
(आधार न्युज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
मुल: माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकराने मुल शहरात श्रीराम धान्‍य प्रसादाच्‍या किट्सचे वितरण करण्‍यात आले. श्रीराम नवमीच्‍या शुभमुहूर्तावर बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात गरीब व गरजू नागरिकांना 10 हजार श्रीराम धान्‍य प्रसादाच्‍या किट्सचे वितरण करण्‍याचा संकल्‍प आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केला होता. बल्‍लारपूर शहरातून या उपक्रमाचा शुभारंभ करण्‍यात आला होता. 6 एप्रिल रोजी मुल शहरात या किट्स वितरीत करण्‍यात आल्‍या.
श्रीराम धान्‍य प्रसाद म्‍हणून वितरीत करण्‍यात येणा-या या जीवनाश्‍यक वस्‍तुंच्‍या किटमध्‍ये आटा (गव्‍हाची कणीक),  तांदुळ,   बेसण,   तेल,   मीठ,   मिर्ची,   हळद,  पारले बिस्‍कीट,  साखर,  चहापत्‍ती,   डेटॉल,   बटाटे व कांदे या वस्‍तुंचा समावेश आहे. कोरोना विषाणुच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवर जाहीर करण्‍यात आलेल्‍या लॉकडाऊनच्‍या परिस्‍थीतीत गरीब व गरजू नागरिकांना या किट्सच्‍या माध्‍यमातुन मदतीचा हात देण्‍यात येत आहे. मुल शहरात प्रभाग क्र. 3 मधून किट्स वितरणाचा प्रारंभ करण्‍यात आला. यावेळी न.प. उपाध्‍यक्ष नंदू रणदिवे, भाजपा नेते प्रभाकर भोयर, प्रभाग क्र. 3 चे नगरसेवक प्रशांत समर्थ, अजय गोगुलवार आदींची उपस्थिती होती. त्‍याचप्रमाणे नगरसेवक विनोद सिडाम, सौ. रेखा येरणे, सौ. शांता मांदाडे, सौ. वनमाला कोडापे, सौ. विद्या बोबाटे, अनिल साखरकर, सौ. आशा गुप्‍ता, प्रशांत लाडवे, सौ. संगीता वाळके, सौ. वंदना वाकडे, महेंद्र करकाडे, मिलींद खोब्रागडे, सौ. प्रभा चौथाले, सौ. मनिषा गांडलेवार, चंद्रकांत आष्‍टनकर या नगरसेवकांनी आपआपल्‍या प्रभागात श्रीराम धान्‍य प्रसादाच्‍या किट्स चे वितरण गरीब व गरजूंमध्‍ये केले.