सावली येथे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवारांकडून मोफत अन्नधान्य वाटपाला शुभारंभ
Bhairav Diwase. April 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सावली तालुका प्रतिनिधी) मोनिका दि भुरसे, साखरी
सावली: लॉकडाऊन व संचारबंधीत रोजगार उपलब्ध होत नसल्याने आर्थिक विवंचनेत असणाऱ्या जिल्ह्यातील ४० हजार कुटूंबाना मदतीचा हात मिळाला आहे . त्यांना १५ दिवस लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण,मदत व पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या शुभ हस्ते आज ५ एप्रिल ला सावली येथे करण्यात आले.शेतमजूर व गरजवंताना मोफत जीवनावश्यक वस्तू वाटपावेळी नगराध्यक्ष नगरपंचायत विलास यासलवार,तहसीलदार सौ.पुष्पलता कुमरे,ना. तहसीलदार सागर कांबळे मुख्याधिकारी नगरपंचायत मनीषा वजारे,पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे,पंचायत समिती सभापती विजय कोरेवार तसेच दिनेश चीटनूरवार जेष्ठ काँग्रेस नेते सावली ता.अध्यक्ष यशवंत बोरकुटे,भोगेश्वर मोहूर्ले उपनगराध्यक्ष,विजय मूत्यलवार,राजू सिध्दम सरपंच पाथरी,नितीन दुवावार,संदीप पुण्यपवार,प्रफुल्ल बोमणवार,छत्रपती गेडाम,उपस्थित होते.
यावेळी ५० कुटुंब गरजवंतांना अन्न धान्य व जीवनावश्यक किट देऊन शुभारंभ करण्यात आले.शासनाकडून जे साहित्य मिळणार आहे ते साहित्य मिळेलच.पण त्या व्यतिरिक्त पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने हे साहीत्य मोफत मिळणार आहेत.गोर गरीब जनतेचे कैवारी,समाजाने समाजाच्या कामात आले पाहिजे या उक्ती नुसार पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार हे नेहमीच कार्य करीत असतात.गरजू,गरीब,शेतकरी,शेतमजूर या लोकांना मदत करण्यासाठी अग्रेसर असतात अशी त्यांची जनतेमध्ये ओळख आहे