Click Here...👇👇👇

सावली पोलिस मदतीसाठी पुढे सरसावले, यवतमाळ जिल्ह्यातील भटक्याना जीवनावश्यक वस्तूची मदत.

Bhairav Diwase
बेघर कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटप करण्यासाठी खाकी वर्दीतला माणूस रस्त्यावर आला
    Bhairav Diwase.   April 04, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) मोनिका दि भुरसे, साखरी
सावली: सावली तालुक्यातील व्याहाड बुज.येथे सावली पोलिसांनी बाहेर जिल्हातून आलेल्या भटक्या लोकांना जीवनावश्यक वस्तु देऊन मानवतेचा संदेश दिला आहे.केवळ गुन्हेगारीचे कर्दनकाळ म्हणून पोलिसांची ओळख असते,या पोलिसांची जरब व धाक बहुतांशी सामान्य नागरिकांवर सुद्धा असते . पोलिसांना सहकार्य वा मदत मागण्यास कोणी पुढे धजावत नाही,मात्र अश्यातच कोरोना वायरस च्या समूळ नष्टतेसाठी पुकारलेल्या संचारबंदी मुळे अनेक कुटुंब जागच्याजागी उघड्यावर पडलेली आहेत,ज्यांना दोन वेळेची खाण्याची व राहण्याची सुद्धा भ्रात उरली नाही अश्या बेघर कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटप करण्यासाठी खाकी वर्दीतला माणूस रस्त्यावर आला आहे.सावली तालुक्यातील व्याहाड बुज.या गावात यवतमाळ जिल्ह्यातील घाटजी तालुक्यातील खापरी येथील आठ कुटुंब भटके लोक (उतारू) दोन महिन्यापूर्वी आले होते,मात्र सध्या कोरोना व्हायरस प्रादुर्भावामुळे जिल्हा बंदी झाल्याने त्या लोकांना बाहेर जाता आले नाही व फिरण्याची बंदी व काम बंद असल्यामुळे त्यांच्या जवळ असलेले अन्नधान्य व पैसे संपल्यामुळे जगावे कसे ? हा प्रश्न आवासून उभा राहिला . ही बाब सावली पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे याना माहीत होताच त्यानी आपल्या पोलिस सहकारी सोबत जाऊन त्याना पूर्णपणे जिवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.व सोबतच तुम्हाला काही अडचण भासत असेल तर मला कळवा असे त्याना आश्वासीत केले आहे.यावेळेस पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे व पोलिस सहकारी तसेच पारस खजांची,राकेश दंडमवार,मंगेश सूरमवार यांच्या उपस्थितीत जीवनाश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले .