सावली नगरपंचायतीचे नागरिकांना घरातच राहण्याचे केले आव्हान
Bhairav Diwase. April 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)मोनिका दि भुरसे, साखरी
सावली: संपूर्ण जगात कोरोना या महाभयंकर विषाणू ने थैमान घातले असून देशावर महामारी चे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्यातच देशात 21 दिवसाचा लॉकडाऊन, संचार बंदी तसेच संपूर्ण महाराष्ट्रात राज्य व जिल्हा बंदी करण्यात आली आहे. तरी देखील महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव पहावयास मिळत आहे. रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करीत आहे. या विषाणूचा नायनाट करता यावा यासाठी पोस्टर्स, बॅनर्स, लाऊडस्पीकर द्वारे जनजागृती करण्यात येत असून सावली नगरपंचायतीने बाजार चौक येथील रस्त्यावर लिखाणाद्वारे कोरोना या महाभयंकर अशा विषाणूपासून जनतेने सतर्क असावे, या महाभयंकर विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी घरातच राहून या विषाणू चा नायनाट करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन रस्त्यावरील लिखनाद्वारे सावली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी मनीषा वजाळे केले आहे.