तेलंगाणा राज्यात अडकले हजारो मजूर, लॉकडाऊन वाढल्याने संभ्रमात.
Bhairav Diwase. April 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)मोनिका दि भुरसे, साखरी
सावली: सावली तालुक्यातील मिरची तोडण्यासाठी गेलेले 3945 मजूर तेलंगणा राज्यात अडकले असून तेलंगणा राज्याने 3 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविल्याने मजुरांना गावाकडे परतता येणार की नाही हा संभ्रम मजूर व नातेवाईकांमध्ये आहे. सावली तालुक्यात शेतीशिवाय दुसरे मजुरीचे साधन नसल्यामुळे सोयाबीन काढणी, मिरची तोडणी या हंगामी कामांकरिता हजारो मजूर जात असतात. तालुक्यातील हजारो मजूर मिरची तोडणी कामाकरिता तेलंगणा राज्यातील खंमम जिल्ह्यात गेलेले आहेत. देशात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर आहेत तिथेच अडकून पडले. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्षात ही बाब आणून दिली. चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी कुठले मजूर तेलंगणा राज्यात आहेत, त्यांची माहिती काढण्याचे आदेश दिले. सावली तालुक्यातील तहसीलदार यांचे आकडेवारीनुसार 3945 मजूर तेलंगणा राज्यात अडकले आहेत. तेलंगणा सरकारने मजुरांची काळजी घेत प्रती व्यक्ती 12 किलो तांदूळ व 500 रुपये मदत दिली. 14 एप्रिल नंतर गावाकडे जाऊ या आशेने मिरची तोडणीचे काम करीत आहेत. मात्र तेलंगणा सरकारने आणखी 3 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविल्याने जाता येणार की नाही या संभ्रमावस्थेत असून मजुरांमध्ये असंतोष वाढलेला आहे. माझेकडे तालुक्यातील अनेक मजुरांचे संपर्क नंबर असून नियमित त्यांचे संपर्कात आहे. तेलंगणा सरकारकडून 12 किलो तांदूळ व 500 रुपये मदत मजुरांना मिळालेली आहे. वाढीव 3 जूनच्या लॉकडाऊनमुळे मजूर घाबरलेले आहेत मात्र ही बाब पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांचे लक्षात आणून दिली आहे व शासन स्तरावर उपाययोजना सुरू आहेत. तरी विजय कोरेवार सभापती पं स सावली यांनी नातेवाईकांनी मजुरांना धीर देण्याचे काम करावे असे म्हटले.