महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ सावली तर्फे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप.
Bhairav Diwase. April 08, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)मोनिका दि भुरसे, साखरी
सावली: देश सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वत्रीक स्तरावर सर्वांच्या सहकार्याने एक विश्वयुद्धा प्रमाणे लढा देत आहे. देशातील प्रत्येक सामाजीक, आर्थीक, राजकीय, स्तरावरुन मदतीचा ओघ सुरु झाला. प्रत्येक संघठना व्यक्ती या लढाईत आपआपला योगदान देत आहे. यामध्ये सावली तालुका महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ सुध्दा खारीचा वाटा उचलता यावा.
सावली तालुक्यातील सर्वसामान्य नागरीकांकरीता जिवाची पर्वा न करता जे आरोग्य विभागातील कर्मचारी,गावपातळीवरील आरोग्य सेवक,ग्राम पंचायत कर्मचारी,आशा वर्कर,पोलीस पाटील,दक्षता पथक,पेट्रोल पंप, निर्मानाघीन कामावरील कामगार, दैनंदीन जीवनावश्यक वस्तु पुरवीणारे,दुध,भाजीपाला, वर्तमान पत्र पोहचविनारे,किराणा दुकानदार अशी मंडळी करीता जवळपास दोन ते तीन हजार माँस्क चे वितरण करण्यात आले व सुरु आहे.याकरीता संघाचे अध्यक्ष श्री.अनील भाऊ स्वामी, यांचे मार्गदर्शनात उपाध्यक्ष.श्री सतीश बोम्मावार,सचिव लखन मेश्राम,माजी अध्यक्ष प्रवीन गेडाम,माजी सचिव,दिलीप फुलबांधे,जेष्ठ सदस्य शितल पवार,विजयभाऊ कोरेवार, आशिष दुधे,अनील गुरनुले, सुजित भसारकर,राकेश गोलेपेल्लीवार,आशिष पुन्यपवार, खोजींद्र येलमुले,सुधाकर दुधे,सुनील दहेलकर,सुधाकर दुधे यांचे सह सर्व पत्रकार सदस्य परिश्रम घेऊन कार्य करीत आहेत.