Click Here...👇👇👇

आमदार श्री किर्तीकुमार (बंटीभाऊ )भांगडीया यांचे कडून मध्यप्रदेश येथील व्यवसायीक कुटुंबाना जांभुळघाट येथे किराणा साहीत्य व आर्थिक मदत.

Bhairav Diwase
मध्य प्रदेश (MP)  यांनी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे मानले आभार.
  Bhairav Diwase.  April 08, 2020
(आधार न्युज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
चिमुर: संपूर्ण देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील प्रत्येक राज्य व जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या कलम १४४ लागू करून संचारबंदी केल्यामुळे चिमूर विधानसभा क्षेत्रातील जांभूळघाट येथे मध्यप्रदेश येथील आयुर्वेदिक जळी बुट्टी औषधी विक्री व्यवसाय करणारे २१लोकांचे कुटुंब जांबुळघाट येथेच अडकले व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांचेवर उपसमारीची पाळी आली अश्यातच त्यांच्या कुटुंबामध्ये डिलिव्हरी सुद्धा झाली ही बाब चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्री किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांना माहीत होताच त्यांनी मदत पाठवली.

      आमदार बंटीभाऊ यांनी या कटुंबाला तांदूळ, गहू,किराणा व इतर जीवनावश्यक वस्तुंची मदत केली व आर्थीक मदत दिली एक लोकप्रतिनिधी ची खरी समाजसेवा पाहून ताजपरी सिंग, दिलीप सिंग, तिरत सिंग ,थाने सिंग  गाव सिथपूर तहसील नागोद जिल्हा सतना 
राज्य :- मध्य प्रदेश (MP)  यांनी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे आभार व्यक्त केले.

     जांभूळघाट येथे साहित्य व आर्थिक मदत करतांना भिसी-आंबोली जिल्हा परिषद प्रमुख श्री नितिनभाऊ गभने, युवा नेते श्री आकाशभाऊ ढबाले,श्री राजुभाऊ साठोने,श्री झ्यामदेवभाऊ आत्राम उपस्थित होते.कोरोनाची सर्वत्र भीती असताना आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे मार्गदर्शनात श्री नितिनभाऊ गभने व त्यांची टीम जनसेवेत व्यस्त राहून प्रत्येक गरजू कुटुंबातील लोकाना मदत पोचवत असल्याने मध्यप्रदेश येथील कुटुंबातील लोकांनी त्यांचे सुध्दा आभार व्यक्त केले.