Click Here...👇👇👇

सावली तालुक्यातील साखरी गावात दररोज सकाळी व सायंकाळी खुलेआम देशी व मोहफुलांची साठ ते सतर लीटर दारू विक्री.

Bhairav Diwase
साखरी येथे देशी व मोहफुलांच्या दारूची खुलेआम विक्री पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष.
      Bhairav Diwase.  April 08, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)मोनिका दि भुरसे, साखरी
सावली: सावली तालुक्यातील साखरी गावात दररोज सकाळी व सायंकाळी खुलेआम देशी व मोहफुलांची साठ ते सतर लीटर दारू विक्री केल्या जाते.गावातील असंख्य लोक कोणतीही भीती न बाळगता मनसोक्तपणे दारू विकत आहेत आणि दारू पिण्याकरिता बाहेर गावातून अनेक लोक येत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता टाळू शकत नाही.आज प्रशासनाने लॉकडाउन व संचारबंदी करून कोरोनावर नियंत्रण करण्याचे प्रयत्न करीत आहेत.अशातच साखरी येथील दारू विक्रेते घरात व वैनगंगा नदी घाटावर जाऊन गडचिरोली जिल्ह्यातील लोकांना दारु विकत आहेत त्यामुळे कोरोनाला स्वतहुन बोलवित आहे असे चित्र दिसत आहे. 
या बाबीकडे पोलीस प्रशासनाचे पूर्णता दुर्लक्ष दिसत आहे. सर्व घटना माहिती असूनही गावातील कोणतीही समिति या बाबीला गंभीर घेत नाही आहे.अशीच स्थिती चालू राहिली तर गावाला कोरोनापासून वाचविता येणार नाही.दारूविक्रेत्याला आळा घालून गावात दारूबंदी करावी अशी मागणी गावातील नागरिक करीत आहेत.