Click Here...👇👇👇

चिमुर तालुक्यातील सातारा या गावच्या रहिवाशी असलेल्या यमुना गायकवाड 55वर्षाच्या महिलावर वाघाने केला हमला.

Bhairav Diwase
वाघाच्या हल्यात महिलेचा मृत्यु
     Bhairav Diwase.  April 08, 2020
(आधार न्युज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
चिमुर: चिमुर तालुक्यातील सातारा या गावच्या रहिवाशी असलेल्या यमुना गायकवाड 55वर्षाच्या महिलावर वाघाने हमला केल्याने महिलेचा जागीच मृत्यु झाला. ही घटना आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. सातारा गाव ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प मध्ये येतो. तिथुन नागरीक जंगलामध्ये मोह वेचण्याकरीता जात असतात. आज हि महिला मोह जमा करण्यासाठी जगलात गेली होती. यावेळेस लपुन बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक त्या महिलेवर हमला केल्याने, त्या महिलेचा मृत्यु झाला. हि घटना  वनविभागाला माहिती झाली असता, वन विभागाची टिम घटनास्थळी दाखल होवुन घटनास्थळी पंचनामा केला.व त्या मृत्यू महिलांचा प्रेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.