Click Here...👇👇👇

चंद्रपूरकरांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. आमदार किशोर जोरगेवार

Bhairav Diwase
अफवांवर विश्वास ठेवू नका - चंद्रपूरात सध्या कोरोनाचा एकही पाॅजिटिव्ह रुग्ण नाही - आ. किशोर जोरगेवार
   Bhairav Diwase.   April 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे, डोंगरहळदी तुकुम
चंद्रपूर: चंद्रपूरात कोरोना चा पहिला रुग्ण आढळल्याच्या बातम्या सध्या सोशल मिडीयासह काही प्रसार माध्यमांवर प्रसारित होत आहे. मात्र पूर्ण माहिती न घेता या बातम्या प्रसारीत केल्या जात असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका चंद्रपूरात सध्या एकही रुग्ण कोरोना पाॅजेटिव्ह नाही. पाॅजेटिव्ह आढळलेला रुग्ण हा चंद्रपूरचा रहिवासी असला तरी तो इंन्डोनेशीया वरुन भारतात परतला असता त्याला नागपूर येथे विलगीकरन कक्षात ठेवण्यात आले असून त्याचा चंद्रपूरशी कोणताही संबंध आलेला नाही अशी माहीती आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकातून दिली आहे. दक्षता म्हणून बाहेर जिल्ह्यातून कोणताही व्यक्ती योग्य तपासणी केल्या शिवाय चंद्रपुरात दाखल होऊ देऊ नका अशा सूचनाही चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आ. जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या आहे.
 सध्या कोरोना बाबत अनेक अफवा पसरवील्या जात आहे. दरम्यान चंद्रपूरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याची बातमी एका न्युज चॅनलवर प्रसारीत करण्यात आली आहे. ही बातमी सोशल मिडीयावर वेगाने पसरवली जात आहे. मात्र सदर बातमी परिपूर्ण माहिती न घेता प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर  कोरोनाग्रस्त युवक हा चंद्रपूरातील रहिवासी आहे. मात्र तो इंन्डोनेशीयाला राहत होता. तो काही दिवसांपूर्वी  स्वदेशी परतला या दरम्याण त्याला नागपूर विमानतळावरुनच रुग्णालयात नेण्यात आले आहे. सध्या तो नागपूर येथेच विलगीकरन कक्षात असून त्याच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. सदर रुग्ण चंद्रपूरातील असला तरी त्याला कोरोनाची लागन  झाली तेव्हा पासून तो चंद्रपूरात आलेला नाही. त्यामूळे चंद्रपूरकरांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे. तसेच पुढील काही दिसव चंद्रपूरकरांनी सावधगिरी बाळगावी. दक्षता म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता चंद्रपूर जिल्ह्याच्या पूर्ण सीमा बाहेरून येणाऱ्यांसाठी बंद करण्यात आल्या आहे. असेही आ. किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.