Click Here...👇👇👇

पोभुर्णा तालुक्यातील जाम तुकूम येथे जनजागृती व मार्गदर्शन उपक्रम.

Bhairav Diwase
जाम तुकुम गावात प्रत्येक कुटुंबाना डेटाल साबणाने वाटप.
         Bhairav Diwase.    April 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा 
पाेंभुर्णा: काेराेना विषाणू ने जगाला हादरवून साेडलेला आहे. भारतातही काेराेना ग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. राज्यातही कोरोना विषाणू ने कहर घातलेला आहे .राज्यात कोरोना ग्रस्ताची संख्या 868 वर पोहचली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा जरी एक ही रुग्ण आढळून आलेला नसला, तरी प्रशासना कडून याेग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. सध्या जगभरात कोरोना व्हायरस ने थैमान घातले असून, त्याचे पडसाद भारतातही दिसू लागले,महाराष्ट्रात सुद्धा कोरोना चे रुग्ण आढळले, या कोरोना वर मात करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर करून, शासनस्तरावर अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
कोरोना विषाणू या पार्श्वभूमीवर आज पोभुर्णा तालुक्यातील जाम तुकूम येथे जनजागृती उपक्रम राबविण्यात आला, ग्रामपंचायत जाम तुकुम चे कर्मचारी तथा आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी, गावात प्रत्येक घरी जाऊन कोरोना पासून स्वतःचे रक्षण कसे करता येईल यावर मार्गदर्शन केले ,यासोबतच घराघरात हात धुण्यासाठी साबणाचे वाटपही करण्यात आले. सर्वांनी आपापली नीट काळजी घ्यावी, नेहमी हात धुवावे, विनाकारण घराबाहेर पडू नये,मास्कचा वापर करावा, घाबरू नये, असे आव्हान येथील सरपंच तथा आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले.