Click Here...👇👇👇

इतर दुकाने सुरू करण्याचा निर्णय चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने 12 तासांच्या आत मागे घेतला.

Bhairav Diwase
प्रशासनाने आपला निर्णय मागे घेत फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकानेच सुरू ठेवण्याचा निर्णय
     Bhairav Diwase.    April 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील अत्यावश्यक वस्तूंप्रमाणेच इतर काही गोष्टींची दुकाने आठवड्याच्या ठराविक दिवशी ठराविक वेळेसाठी सुरू करण्याचा निर्णय चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने घेतला होता. हा निर्णय घेतल्याच्या 12 तासाच्या आत तो मागे घेण्यात आला आहे. हा निर्णय घेतल्यानंतर मंगळवारी बाजारपेठ लोकांनी फुलून गेली होती. संचारबंदीचं सर्रास उल्लंघन करण्यात येत होते. शहरातील रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी मोठ्या प्रमाणावर दिसत होत्या. परिस्थिती बिघडण्याची शक्यता दिसायला लागल्याने प्रशासनाने आपला निर्णय मागे घेत फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकानेच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
चंद्रपूर जिल्ह्यासाठी प्रशासनाने एक महत्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला होता. लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सगळी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने मंगळवारपासून अत्यावश्यक सेवेच्या दुकानांसह इतर काही वस्तूंची दुकानेही ठराविक वेळेत सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. 7 एप्रिलपासून 14 एप्रिलपर्यंत प्रायोगिक तत्वावर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार होती. प्रत्येक सेवेच्या दुकानासाठी आठवड्यातील एक वार निश्चित करण्यात आला होता आणि त्या-त्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेतच ही दुकाने सुरू राहणार होती. मात्र हा निर्णय मंगळवारीच जिल्हा प्रशासनाने मागे घेतला. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाहीये. ही संपूर्ण जिल्ह्यासाठी आणि दिलासादायक आणि आनंदाची बाब आहे. यामुळे इतरही काही दुकाने सुरू करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला होता. हा निर्णय प्रायोगिक तत्तावर घेण्याचं ठरलं होतं. जर नव्याने सुरू होणाऱ्या दुकानांमुळे अनावश्यक गर्दी झाली तर या निर्णयावर फेरविचार होऊ शकतो असे प्रशासनाने आधीच स्पष्ट केले होते.