सोशल डिस्टन्सचीही घेतली खबरदारी
Bhairav Diwase. April 07, 2020
(आधार न्युज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
गोंडपिपरी: देशात कोरोनाचे संकट घोंगावत आहे.लॉकडाऊनमुळे सर्वत्र व्यवहार ठप्प झाले आहेत.यातच हातावर आणून पानावर खानाऱ्यांची संख्या कमी नाही.अश्याच गरजू कुटुंबियांना गोंडपिपरी तालुक्यातील विविध भागात व ग्रामीण भागात शेकडो गरजुना गोंडपीपरी येथील प्रतिष्टीत व्यापारी निलेश संगमवार यांच्या वाढदिवसानिमित्य अन्नधान्यासह ईतर महत्वपूर्ण साहित्याचे आज वितरण करण्यात आले. देशापुढे कोरोनाने संकट उभे केले आहे.यामुळे सर्वत्र २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहित करण्यात आला.या स्थितीत नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत.अश्यातच मात्र हातावर आणून पानावर खाणाऱ्या कुटुंबियांपुढे मोठे संकट ओढावले.त्या कुटुंबियांची खाण्यापिण्याची पंचायत निर्माण झाली. ही बाब गोंडपिपरी चे प्रतिष्टीत व्यापारी निलेश संगमवार यांच्या लक्षात आली.मग काय ?गोंडपीपरी सह परिसरातील गरजू कुटुंबियांची यादी तयार करण्यात आली.त्यांना आज सकाळी निलेश संगमवार मित्र परिवारतर्फे लग्नाच्या वाढदिवसानिमित्य अनावश्यक खर्च टाळून यरक हात मदतीचा उपक्रमा अंतर्गत गरजूंना साहित्याचे वाटप करण्यात आले.विशेष म्हणजे "सोशल डिस्टन्स"पाळल्या जात नाही,म्हणून सर्वत्र बोंबाबोंब केली जात आहे.अश्यावेळी मात्र विशेष काळजी घेतली.यावेळी निलेश संगमावार,वनिता संगमावार,बबनजी निकोडे, साईनाथ मास्टे, राकेश पुन, चेतन गौर, बालू फुकट, गणेश डहाळे,दिनेश भोयर, अमित हूलके उपस्थित होते.